Home बुलडाणा आता गॅससाठी ग्राहकांना उन्हात उभे राहण्याची गरज नाही ;

आता गॅससाठी ग्राहकांना उन्हात उभे राहण्याची गरज नाही ;

20

 

तहसीलदारांकडून दखल आता घरपोच मिळणार सिलिंडर

साबिर खान

संग्रामपूर तालुक्यात घरगुती गॅस पुरवठा कोलमडला होता घरपोच सिलिंडर मिळणे अवघड झले होते या बाबत काही व्रुत्त पत्रात बातमी प्रकाशित होताच संग्रामपुर तहसीलदार यांनी दखल घेतली.त्यामुळे अखेर गुरुकृपा इंडियन गॅस एजन्सीने गोडाऊनवर शासन नियमावलीचा फलक लावण्यात आला असून आता ग्राहकांना द्वारपोच मिळणार गॅस सिलिंडर, याबाबत ग्राहकांना सूचना देण्यात येणार आहे.
सध्या संग्रामपूर तालुक्यातील तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे पोहोचले आहे,मात्र नागरिकांना सिलिंडर मिळविण्यासाठी तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. वेळेवर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 10-15 दिवस उलटूनही घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचे ग्राहकांनी सांगितले होते तहसीलदार प्रशांत पाटील यांनी त्वरित या प्रकारा ची दखल घेतल्याचे दिसून येत आहे. त्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गॅस वितरणा बाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. आता घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर गॅस एजन्सी किंवा गोदामावर जाऊन घेता येणार नाहीत, तर ते थेट ग्राहकांच्या घरपोच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या गॅस बुकिंग केल्यानंतर संबंधित ग्राहकास संदेश पाठविण्यात येतो. तो संदेश ग्राहकाने आपल्याकडे गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या व्यक्तीस दाखवावे,त्यानंतरच गॅस सिलिंडर मिळतो. मात्र एजंसीच्या ढिसाळ नियोजनामुळे येथे वेगळीच स्थिती होती, आता मात्र प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून आले आहे.

नव्या नियमावलीतील महत्वाचे मुद्दे…

1. रांगा लावण्यास मनाई कोणत््याही ग्राहकाने गॅस एजन्सी किंवा गोदामासमोर रांगा लावू नयेत.
2. ओटीपी प्रणाली अनिवार्य : गॅस सिलिंडरचे वितरण केवळ ऑनलाइन बुकिंगनंतर प्राप्त होणाऱ्या ओटीपी प्रणालीद्वारेच केले जाईल.
3. पुरेसा साठा उपलब्ध: जिल्ह्यात आणि राज्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत््याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
4. हेल्पलाईन सुविधा ग्राहकांच्या सोयीसाठी पीएनजी व एलपीजीसंदर्भात तक्रार किंवा माहितीसाठी लवकरच विशेष हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. असा नियमावलीचा फलक गॅस एजन्सीने गोडाऊनवर लावला आहे.

Previous articleबुलढाण्यात प्रा .श्याम मानव करणार बुवाबाजीचा भांडाफोड
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.