Home बुलडाणा हनुमान चालीसेतून भक्ती आणि गोमातेच्या संरक्षणातून शक्ती मिळते. प्रवीणभाई तोगडिया.

हनुमान चालीसेतून भक्ती आणि गोमातेच्या संरक्षणातून शक्ती मिळते. प्रवीणभाई तोगडिया.

90

 

मोताळा नगरीत प्रवीण भाईंचे उत्स्फूर्त स्वागत कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक:

मोताळा : बुलडाणा
हिंदु हृदय सम्राट आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भाई तोगडिया यांचे आज मोताळा नगरीत उस्फुर्त स्वागत करीत संवाद सभा संपन्न झाली.
महाराष्ट्र संपर्क अभियानावर असलेले प्रवीण भाई तोगडिया वर्धा जिल्ह्यात सभेसाठी निघालेले असतांना मोताळा येथून जातांना फाट्यावर त्यांनी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव स्वागत समारंभ आणि संवाद सभेसाठी वेळ दिला. यावेळी प्रथमतः मोताळा फाट्यावर राष्ट्रीय बजरंग दल, आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्रामस्वराज्य समिती, वारकरी धर्म परिषद आदी संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत संवाद बैठकीकडे आगेकूच केली. आठवडी बाजारात कार्यकर्त्यांसोबत साधलेला बैठकीत प्रवीण भाई तोगडिया यांनी गौ संरक्षण, संघटन बांधणी, हनुमान चालीसा आदी महत्त्वपूर्ण मुद्द्यावर संवाद साधला.
राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत उपाध्यक्ष भुपेश पाटील,जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप वासुदेव महाराज शास्त्री, प्रांत मंत्री जीवनसिंग राजपूत,
गोपाल पवार.सुरज राऊत ,ऋषिकेश नेमाडे, योगेश विधाते. प्रमोद जोशी. सुरज देशमुख. अविनाश जाधव,जीवन सोनार यांच्यासह असंख्य बजरंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
_&____

कोण आया रे कोण आया..!
हिंदूओका शेर आया..!

कोण आया रे कोण आया..हिंदूओका शेर आया.. जय श्रीराम च्या नाऱ्यांनी अचानक दुपारी मोताळा फाटा हिंदूंच्या गर्जनेने दुमदुमला. तेवढ्यात झेड प्लस सुरक्षा असलेल्या पोलिसांच्या गाड्यांचा ताफा मोताळा फाट्यावर धडकला. बाजारचा दिवस असलेल्या गजबजलेल्या मोताळा फाट्यावर अचानक नारेबाजी आणि पोलिसांचा ताफा कशासाठी..? याच विचारात नागरिक सामान्य नागरिक असतांना अचानक हिंदुहृदयसम्राट प्रवीणभाई तोगडीया आल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता असंख्य हिंदूं वेळेवर संघटित झाले. आणि मोताळा नगरी प्रवीण भाईंच्या स्वागतासाठी सज्ज झाली. हिंदूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत प्रवीण भाईंचे उत्स्फूर्त स्वागतही केले.
_&___