Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

साखरखेर्डा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ,

210

 

अमिन शाह

साखरखेर्डा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बुद्धाचार्य डॉ. श्रीराम गवई यांनी बुद्धवंदना घेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपस्थितांनी पूजन करून वंदन केले.

यावेळी ठाणेदार गजानन करेवाड, माजी प्राचार्य संतोष दसरे, माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी सभापती राजू ठोके, दिलीप इंगळे यांनी आपले विचार मांडले. तसेच सरपंच पती अमित जाधव, भाजपाचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसभापती सुनील जगताप, संतोष मंडळकर, देवानंद खंडागळे, वैशिष्ट्य खरात, दिलीप बेंडमाळी, माजी उपसरपंच सैय्यद रफीक, रामदाससिंग राजपूत, संग्रामसिंह राजपूत यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष गवई व दर्शन गवई यांनी केले, तर अशोक गवई यांनी समाजप्रबोधनपर कविता सादर केली. कु. अनिता मोरे या शालेय विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व त्यांच्याकडून आपण काय शिकावे यावर विचार मांडले.
त्यानंतर दुपारी तीन वाजता भीमनगरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. एका रथावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्ती, तर दुसऱ्या रथावर तथागत गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पती अमित जाधव व ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम शहा यांनी पुष्पवृष्टी केली, तर गुजरी चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.त्या नंतर गुजरी चौकात चला चला मेरे ताज का संदल ही कव्वाली वाज्विन्यात आली मिरवणुकीत मुलींच्या लेझीम व टिपरी नृत्याने विशेष आकर्षण वेधले. मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश गवई, समाजभूषण माजी सैनिक अर्जुन गवई, दादाराव गवई, माजी सरपंच कमलाकर गवई, संदीप खिल्लारे यांसह युवकांनी केले.

शरबत वाटप पुष्प व्रुष्टि ,

मुस्लिम समाज युवा मंडल ,तर्फे मिरवणूक गुजरी चौकात येताच पुष्प व्रुष्टि करण्यात आली व ठंड शरबत चे वाटप करण्यात आले या वेळी
असलम शाह
अशफाक शाह
आसिफ कूरेशी
तैजीफ शाह
ईबराहीम शाह
यूनुस शाह
जूबेर शाह
रिजवान शाह
शे फैजान
शे अतीक
वसीम शाह
रेहान शाह
रीजवान कूरेशी
शे फारुक
अकरम शाह
मुजफ्फर कुरेशी
शे अखतर ड्रायव्हर
शे मुफीज
अफजल शाह
शे मकसूद आदि उपस्थित होते ,

शरबत वाटप प्रसंगी मुस्लिम युवक