Home बुलडाणा साखरखेर्डा येथे ई – क्लास जमिनीवरून चौघा भावात भांडण एकाचा मृत्यू ,...

साखरखेर्डा येथे ई – क्लास जमिनीवरून चौघा भावात भांडण एकाचा मृत्यू , दोघे गंभिर जखमी

63

 

 

अमीन शाह

साखरखेर्डा , बुलडाणा

येथील मेहकर रोडवरील महालक्ष्मी तलाव जवळील ई – क्लास जागेवरुन चौघा भावंडात १९ एप्रिल रोजी लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती . यात तिघे गंभीर जखमी झाले होते . त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे . मृतकाचे नाव एकनाथ सिताराम टाले वय ३० वर्ष आहे .
या बाबत हकीकत अशी की , साखरखेर्डा येथील सिताराम टाले यांना सात मुले आहेत . ३५ वर्षांपूर्वी पित्याचे छत्र हरपले . आईने रामदास , भानुदास , देविदास , हरिभाऊ , पांडुरंग , अंबादास , एकनाथ यांचा मोलमजुरी करून संभाळ केला . रामदास , भानुदास , अंबादास , देविदास हे मोलमजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले . तर लहान भावंडांनी महालक्ष्मी तलावाच्या काठावर ई — क्लास जमिनीवर टुमदार धाबा सुरु केला . तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून लहान वयात अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात जम बसवला होता . तिघांचेही विवाह झाले . मालक कोन आणि नौकर कोन यातील फरक कळत नव्हता . २५ वर्षांपासून सुरु असलेल्या व्यवसायावर देविदास यांची नजर लागली . ही जागा मलाच हवी अशी मागणी करुन तिघाही लहान भावंडांना जिवे मारण्याची धमकी देऊ लागला . तिघांनी बाजूची जागा तुला देतो . तुम्ही भांडण करु नका म्हणून गयावया तिघांनी मिळून केली . परंतू मला हीच जागा पाहिजे असा हट्ट धरून देविदास यांच्या अंगात देवदास संचारला . दोन मुलांना सोबत घेऊन तिघाभावंडांचा काटा काढण्यासाठी हातात लाठ्याकाठ्या लोखंडी राॅड घेऊन १९ एप्रिल रोजी सकाळी अचानक हल्ला केला . बेसावध असलेल्या तिघेही हरिभाऊ, पांडुरंग , एकनाथ यांच्या डोक्यात जबर मारहाण झाल्याने तिघेही लहान भाऊ गंभीर जखमी झाले . बेशुद्ध अवस्थेत तिघांना चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तिघेही कोमात असल्याने त्यातील एकनाथ याचा आज ८ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला . तर दोघांवर अद्याप उपचार सुरू आहेत . फिर्यादी पांडुरंग सिताराम टाले यांनी ३० एप्रिल रोजी या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दाखल केली असता साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी देविदास सिताराम टाले , पवन देविदास टाले , श्रीकृष्ण देविदास टाले यांच्याविरोधात कलम ३२४ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . काल रात्री ३०७ दाखल केला तर आज ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी सांगितले . यातील मुख्य आरोपी देविदास सिताराम टाले , पवन देविदास टाले , श्रीकृष्ण देविदास टाले यांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे .

 

फोटो :— एकनाथ सिताराम टाले , आणि याच धाब्याच्या जागेवरून वाद झालेला आहे .