Home महत्वाची बातमी एका पोलीस निरीक्षकाने दुसऱ्या पोलीस निरीक्षकास ठोकल्या बेड्या

एका पोलीस निरीक्षकाने दुसऱ्या पोलीस निरीक्षकास ठोकल्या बेड्या

87

 

अमीन शाह ,

अनेकवेळा एखादा पोलीस अधिकारी आरोपीला अटक करतो पोलीस कर्मचारी अटक करतो वकील अटक करतो सरकारी अधिकाऱ्याला अटक करतो फार फार तर नेत्याला अटक करतो मात्र एका पोलीस निरीक्षकानं दुसऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक केल्याची घटना मुंबईत घडली आहे काय आहे ती घटना आणि कशासाठी करण्यात आली त्या पोलीस निरीक्षकाला , या बाबत मिळालेल्या माहिती नुसार

नितीन भिकाजी विजयकर असं अटक करण्यात आलेल्या त्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तर वाशी (नवी मुंबई) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय काळे यांनी विजयकर आडनावाच्या त्या पोलीस निरीक्षकाला अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक नाळे यांनी ठाणे ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांना एक अहवाल पाठवला आहे.
या अहवालामध्ये म्हटलं आहे, की वाशी (नवी मुंबई) पोलीस ठाण्यात दि. 30 मार्च रोजी राजेश नारायणदास काटरा (दवलगिरी बिल्डिंग, पाईपलाईन रोड घाटकोपर, पूर्व मुंबई) यांनी समक्ष हजर राहून तक्रार दिली, की दि. 29 मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या पत्त्यावरून तुर्भे एमआयडीसीकडे ते जात असताना वाशी ब्रिजखालून पामबीचकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड, सेक्टर 17 नवी मुंबई या ठिकाणी फिर्यादी काटरा यांच्या वाहनाला पुढून आणि पाठीमागून वाहनं आडवी घालून सहा इसमांनी अडवलं.

आम्ही मुंबई पोलीस आहोत’, असं सांगून तुमच्याकडे पैशांचा मोठा साठा आहे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला म्हणजे खरेदी काटा यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अडकविण्यात येईल. यातून वाचवायचा असेल तर आम्हाला दोन कोटी रुपये द्या, असं त्या सहा इसमांनी फिर्यादी काटरा यांना सांगितलं.

त्यानंतर त्या सहा इसमांनी फिर्यादी काटरा यांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनातून त्रिशला को-ऑपरेटिव्ह सोसायटी, प्लॉट नंबर 82, सेक्टर 29 वाशी, नवी मुंबई इथं फिर्यादी काटरा यांच्या घरी घेऊन जात त्यांना धमकवून त्यांच्याकडून दोन कोटी रुपये बळजबरीने घेतले. याप्रकरणी वाशी, नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर (रा. रूम नंबर 605, एक विंग, प्रसाद अपार्टमेंट, जनता मार्केट, भांडूप, पश्चिम मुंबई) यांचा सहभाग असल्यानं त्यांना आज दि. 1 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे. एका पोलीस निरीक्षकाने दुसऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक केल्यानं मुंबईत सर्वत्र खळबळ उडाली आह