Home विदर्भ शिवक्रांती यंग पँथर ग्रुप यांचे वतीने शिवजयंती साजरी

शिवक्रांती यंग पँथर ग्रुप यांचे वतीने शिवजयंती साजरी

147
0

येरला वार्ताहर

 वर्धा –  शिवक्रांती यंग पँथर ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ पोटकर तर प्रमुख म्हणून बालकृष्ण चाफले उपस्थित होते.यावेळी कवडू सिडांम,भारत चालखुरे, मुनेश्वर,प्रकाश जोगी,रत्नाकर वावरे,मेश्रामजी, रमेश किनाके, भाऊराव जोगी कार्यक्रमाला उपस्थित होते.शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्यें गावातील स्पर्धकानी सहभाग घेतला.या कार्यक्रमाद्वारे युवापिढी संघटित होऊन समाज कार्याचा वसा पुढेही जपत राहू असे शिवक्रांती यंग पँथर ग्रुपच्या सदस्यांनी म्हटले.गावातील युवा पिढीने समोर येवुन शिवक्रांती यांग पँथर ग्रुप स्थापन करून शिवजयंतीचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवक्रांती यंग पँथर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.