Home जळगाव आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे शेतकऱ्यांची मंजूर पीक नुकसान विमा रक्कम संदर्भात...

आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे शेतकऱ्यांची मंजूर पीक नुकसान विमा रक्कम संदर्भात मागणी ..

188

रावेर (शरीफ शेख)

मंजूर झालेल्या पीक नुकसान विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील जून 2020 या महिन्यात वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या पिकांचा नुकसान भरपाई विमा मंजूर झालेला आहे, तरी सुध्दा विमा मंजूर रक्कम सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप ही मिळालेली नाही, म्हणून ती पीक नुकसान मंजूर विमा रक्कम त्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी कार्याध्यक्ष विलास ताठे राष्ट्रवादी रावेर यांनी निवेदनाद्वारे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या कडे केली. यावेळी किरण पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ रावेर,राजेंद्र महाजन, विकास पाटील,किरण पाटील, संतोष नवले, योगेश सैतवाल, ज्ञानेश्वर चौधरी, सावखेडा,मनोज बढे, महेश वानखेडे , गिरीश भारंबे,कुष्णा नेहेते, रमेश महाजन, रोझोदा,गोकुळ पाटील, हिरामण पाटील, गणेश पाटील कोचूर,महेंद्र पाटील, गौरखेडा येथील रावेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.