Home बुलडाणा चिखलीतील हिंदू-मुस्लीम बंधु भाव संस्कृतीचे जिवंत उदाहरण : हिंदू बांधवांनी ठेवला रोजा

चिखलीतील हिंदू-मुस्लीम बंधु भाव संस्कृतीचे जिवंत उदाहरण : हिंदू बांधवांनी ठेवला रोजा

92

 

राजकारणासाठी जाती धर्माचा वापर न करता देशात शांतता अबाधित ठेवा : प्रशांत ढोरे पाटील.

*रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व गोद्रीचे सरपंच भरत जोगदंडे यांनी ठेवला रोजा.*

अमीन शाह

चिखली :- एकीकडे देशात हिंदू-मुस्लीम वादाच्या बातम्या रोज येत असतात तर दुसरीकडे बंधुभावाचे अनोखे उदाहरण आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पाहायला मिळाले, रमजान महिना हा इस्लामिक कॅलेंडर मधील सर्वात पवित्र महिना मानला जातो,जो जगभरातील मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो, या पवित्र महिन्यातील उत्सवांमध्ये उपवास,प्रार्थना करणे, सुर्योदय ते सूर्यास्तापर्यंत धूम्रपान,मद्यपान,व खाणे वर्ज्य करणे समाविष्ट आहे, उपवास हा रमजानच्या काळात पूजेचा आणि देवाला शरण जाण्याचा सर्वोच्च प्रकार मानला जातो, देवापासून आशीर्वाद आणि क्षमा मिळवण्यासाठी अनिवार्यपणे उपवास करतात मुस्लिम बांधवांकडून ३० दिवसांमध्ये सूर्योदयापुर्वी अन्न ग्रहण आणि सूर्यास्तापर्यंत उपवास करतात, उपवास (रोजा) हा इस्लामच्या पाच तत्त्वांपैकी एक आहे, जो प्रत्येक मुस्लिम बांधव उपवास करतो,उपवास आपल्याला प्रत्येक वाईट विचारणंपासून दूर ठेवतो आणि संयम राखण्याची सवय बनवत,उपवास केल्याने अन्नधान्याचे महत्त्व कळते आणि दोन वेळच्या जेवणासाठी आसुसलेल्या गरिबांचे दुःख कळते तसेच निद्रा आणि त्या संबंधित विकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील उपवास फायदेशीर आहे, कॅन्सरच्या काही प्रकारची जोखीम कमी करण्याचा सुयोग्य मार्ग म्हणून देखील याकडे पाहिले जाते, तज्ञांच्या अभ्यासात असे निदर्शनास आले की रमजान मध्ये उपवास केल्याने नैराश्य आणि चिंता कमी होऊन मानसिक आरोग्य व स्वास्थ देखील सुधारू शकते,खाणे,मद्यपान, धुम्रपान वर्ज्य केल्याने आत्म संयम,उदारता, दयाळूपणा यासारखे गुण विकसित होतात आणि त्यामुळे क्रोध व मत्सर यासारख्या नकारात्मक भावना देखील नियंत्रीत करण्यास मदत होते, विविध हृदयविकार, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यांच्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी अधून मधून उपवास करणे फायद्याचे आहे, हलके जेवण व संयम पाळणे यामुळे शरीराला स्वच्छ व डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते असे एक ना अनेक फायदे रोजा उपवास ठेवल्याने होतात असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले,
चिखली येथे हिंदू-मुस्लीम एकता असलेल्या संस्कृतीचे उदाहरण देतांना आज शेतकरी नेते अनिल वाकोडे यांनी इफ्तार ठेवली होती यावेळी प्रशांत ढोरे पाटील म्हणाले की आपल्या देशात हिंदू मुस्लिम बंधु भाव निर्माण करून शांतता अबाधित राहावी अशीच प्रार्थना इफ्तारच्या वेळी करण्यात आली.
रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील, गोदरी गावचे सरपंच भरत जोगदंडे यांनी रोजा करून समाजात एकतेचा आदर्श घालून दिला त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..

———————————————-

रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील, गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे यांनी उपवास( रोजा) ठेवत रमजानमध्ये उपवासाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून ते या पवित्र महिन्यात एक दिवस उपवास करतात,उपवासाच्या एक दिवस आधी संध्याकाळपासून त्यांची तयारी पूर्ण केली जाते,उपवास पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून सेहरी केली जाते त्यानंतर नियमानुसार दिवसभर उपवास केला जातो त्यासाठी त्यांना तंजिमभाई, इम्रान भाई,मुक्तार भाई,तौफिक भाई, साबेर शेख व ईतर मुस्लिम मित्रमंडळी रोजा संदर्भात माहिती देत वेळोवेळी सहकार्य करतात.

———————————————-

रोजा बालपणीच्या मित्राचे घर उघडते

प्रशांत, भरत आणि अनिल यांनी सांगितले की, उपवासाच्या दिवशीही ते त्यांचे काम नेहमीप्रमाणेच करतात. उपवासाच्या वेळी तो त्याचा बालपणीचा मित्र प्रा ,तनजीम हुसैन यांच्या घरी जाऊन उपवास सोडतो.
मित्राच्या घरी इफ्तारची पूर्ण व्यवस्था केली जाते, संयम व देवपूजेचा सण असून रोजा उपवास केल्याने जिवनातील अन्न धान्याचे महत्त्व समजते व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास व अनावश्यक मात्रा बाहेर पडण्यास व निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते असे ते म्हणाले.