Home बुलडाणा हरवलेला मोबाईल अंढेरा पोलिसांनी केला परत.

हरवलेला मोबाईल अंढेरा पोलिसांनी केला परत.

21

प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मेरा खुर्द येथील पोलिस पाटील संजय ठाकुर यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल अचानक हरवला होता.दि.१९सप्टेंबर २०२३रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान पोलिस पाटील संजय ठाकुर हे आपल्या बहिणीला आपली स्कार्पियो गाडी येऊन जालना येथे जात असताना अंढेरा फाट्यावर नास्ता करण्यासाठी थांबले असताना अचानक खिशातुन मोबाईल पडल्याने तो हरवला.
याबाबत दि.१९सप्टेंबर २०२३रोजी अंढेरा पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली असुन अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी सदर मोबाईलचा आय‌एम‌ईआय नंबरच्या साहाय्याने आपल्या ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मध्ये सदर मोबाईलचा शोध घेतला असता सदर मोबाईल हा सांगली जिल्हात असल्याचे मोबाईल लोकेशन वरून कळले असता अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून सदर मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितले असता सांगली पोलिसांनी सदर मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेऊन अंढेरा पोलिसांना कुरिअरने पाठवला.दि.१२ मे २०२४ रोजी अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी मेरा खुर्द चे पोलिस पाटील संजय ठाकुर यांना अंढेरा पोलिस स्टेशनला बोलाऊन सदर मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला.यावेळी आपला हरवलेला मोबाईल सापडल्याचा आनंद संजय ठाकुर यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्वच नागरिकांनी आपला हरवलेला मोबाईल परत मिळावा यासाठी आपला हरवलेल्या मोबाईलचा आय‌एम‌इआय नंबर घेऊन अ़ंढेरा पोलिसांशी संपर्क साधावा.असे आवाहन ठाणेदार विकास पाटील यांनी केले आहे.