Home बुलडाणा मॉ साहेब जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी निर्भय जीवन जगावे – प्रा....

मॉ साहेब जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी निर्भय जीवन जगावे – प्रा. डॉ. मीनलताई गावंडे

742

अमीन शाह

चिखली , दि. १४ :- स्वराज्याचे दोन ढाणे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ मॉसाहेब ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमुल्य साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम असून निर्भयपणे जगण्यासाठी महिलांनी जिजाऊ मॉसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवबा निर्माण करावा असे आवाहन अर्थ, बांधकाम सभापती तथा राजमाता जिजाई महिला अर्बनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मीनलताई गावंडे यांनी केले.
राजमाता जिजाई महिला अर्बनच्या कार्यालयात राजमाता मॉसाहेब जिजाउंच्या जन्मोत्सव प्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा सौ.मनीषा शिंदे, संचालक सौ आशालता गावंडे, सौ. माधुरी धुमाळे, सौ. सोनुने व संस्थेच्या व्यवस्थापिका कु. मनीषा रिंढे ह्या उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या वेळी महिलांची उपस्थिती होती.