विदर्भ

वाहन चालवितांना कुंटूंबाच्या जबादारीचे भान ठेवा  – खासदार रामदास तडस

Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १४ :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळणवळणासाठी सोईचे ठरत असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. तरुणांनी वाहन चालवितांना वाहतुक जियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत:सोबत कुंटूबिय आणि इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी , असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

आज सामाजिक न्याय भवन येथे उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस वाहतुक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतुक सुरक्षा अभियानाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, पोलिस वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती.

पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यु होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु आजच्या काळात अपघाताने मृत्यु होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यु होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नविन कायदयासोबतच दंड व शिक्षेत सुध्दा वाढ केली आहे. या कायदयातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुस-याच्या जीवाचा सुध्दा विचार करावा असे श्री तडस म्हणाले.

परिवार हा आयुष्याचा केद्र बिंदू आहे आपली एक चुक दुस-यांच्या मृत्युस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गा|च्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्हयात सुरु आहे. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवितांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. केंद्र शासनाने केलेल्या नविन वाहतुकिच्या नियमाची स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी या कायदयातील तरतुदीनुसार अपघातास कारणीभूत ठरल्यास कोणती ‍ शिक्षा होऊ शकते. याची माहिती नागरिकांना पटवून दयावी असे श्री भिमनवार म्हणाले.

दरवर्षी अपघाताचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या भारत सरकारचे लक्ष आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्हयात यावर्षी 6 टक्के अपघात कमी झाले आहे. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मदयप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतुक करणे व वाहन वेगाने चालविणे या बाबी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष नागरिक व कुंटूंबाचे आपल्याप्रती काही देणे आहे हे समजून वाहतुकीच्या नियमाचे पालन करुन वाहने चालवावीत असे आवाहन पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांनी केले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्याथी, विद्यार्थींनी , नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.

You may also like

विदर्भ

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या ...
विदर्भ

राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसिलदार भगवंत कांबळे यांचा सत्कार,  ‘उपजिल्हाधिकारी पदी बढती,राज्यभरातून अभिनंदन”

धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...