Home मुंबई मायक्रो ओबीसी राजकीय नेत्यांच्या घरावर आंदोलन पुकारणार – प्रजा लोकशाही परिषद

मायक्रो ओबीसी राजकीय नेत्यांच्या घरावर आंदोलन पुकारणार – प्रजा लोकशाही परिषद

44
0

मुंबई , दि. १४ :- (विशेष प्रतिनिधी) – मायक्रो ओबीसी राजकीय नेत्यांच्या घरावर आंदोलन पुकारणार असे प्रजा लोकशाही परिषदच्या शिष्टमंडळाने इस्लाम जिमखाना मुंबई येथे झालेल्या बैठकीत निश्चित केले आहे.

नागरिक दुरुस्ती कायदा रद्द, ओबीसी जातनिहाय जनगणना, रोहिणी आयोगाची अंमलबजावणी, शेतकरी आत्महत्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे निषेधार्थ असे मुद्दे घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात व इतर पक्षातील ओबीसी नेत्यांच्या घरी मोठे आंदोलन उभारणार असल्याचे प्रजा लोकशाही परिषदच्या शिष्टमंडळाने निश्चित केला आहे.
सदर बैठक ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी व महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत दशरथ राऊत, भोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक सतीश दरेकर, लोहार महासंघ महासचिव साहेबराव गोपालघरे, ऍक्टिव्हिस्ट – मुस्लिम ओबीसी संघटना निझमुद्दीन राईस, शेख सिद्दीकी, राष्ट्रीय गुरव महासंघ उपाध्यक्ष पार्थ गुरव, अशोक दरवळकर, अकोला कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ विजय माने, बारा बलुतेदार महासंघ सरचिटणीस चंद्रकांत गवळी तसेच राज्यातील ओबीसी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी च्या शत्रूला सोशल मिडियाने उत्तर देऊ – शाहरुख मुलाणी
आज सोशल मिडिया प्रभावी पणे काम करते त्याअनुषंगाने व्हॉट्स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी माध्यमातून ओबीसींची भूमिका प्रभावीपणे मंडणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले.
Unlimited Reseller Hosting