Home बुलडाणा संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी केली एकच गर्दी* संचारबंदीचा बोलबाला कश्या साठी…?

संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी केली एकच गर्दी* संचारबंदीचा बोलबाला कश्या साठी…?

175

प्रतिनिधी-[ रवि जाधव ]
देऊळगाव राजा:-देऊळगाव राजा येथे दोन दिवसाच्या बंद नंतर सोमवारी नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली.यावेळी नागरिकांनी सुरक्षित अनंत तर पाळलेच नाही शिवाय अनेक नागरिकांच्या तोंडाला मास तर सोडा साधा रुमाल सुद्धा नव्हता. देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.शहरासह ग्रामीण भागातही दिवसांदीवस कोरकणाचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत.अशावेळी नागरिकांनी नियमाचे पालन केले पाहिजे.जास्तीत जास्त सतर्कता बाळगणे गरजेचे असतांना सकाळी ९ ते ७ या दरम्यान नागरिकांनी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगण्याची गरज असतांनाच या दरम्यान नागरिकांनी खरेदी करण्यासाठी एकच झुंबड केली होती.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तेव्हा सुरक्षित अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाल्याने नियमांची घसरगुंडी पाहण्यास मिळते.नागरिकांच्या आशा बेशिस्त वागण्यामुळे शहरात व ग्रामीण भागा मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने या बाबतीत गंभीरपणे घेणे गरजेचे आहे एवड मात्र खर .