Home महत्वाची बातमी शिवराया विद्यार्थी संघटनेचे अल्लीपूर येथे नागरिकांना मार्गदर्शन व मदत केन्द्र सुरू

शिवराया विद्यार्थी संघटनेचे अल्लीपूर येथे नागरिकांना मार्गदर्शन व मदत केन्द्र सुरू

172

वर्धा – हिंगनघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील परिसरात नागरिकांना कोणत्याही समस्यांना अडचणी जावू नये याकरीता शिवराया विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना मार्ग दर्शन व मदत केन्द्र सुरू करण्यात आले असून काही अडचणी आल्यास संघटनेचे अध्यक्ष नितीन सेलकर यांचे शी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समस्या ह्या खूप मोठ्या खुर्चीवर बसल्यावरच कळते अशी समाजात म्हण रूढ झालेली आहे. पंरतु त्याला फाटा देत संघटनेचे कार्यकर्ते जितके लोकांमध्ये वावरतात तितक्या दामदुप्पटीने नागरिकांच्या समस्या संघटनेच्या लक्षात येत आहे .आणि तितक्याच जोराने आणि ताकतीने जिव्हाळा लावत जोमाने कार्यकर्ते काम करत आहे. आज संघटनेकडे आलेल्या समस्यांने अध्यक्षासह कार्यकर्ते ही भारावून गेलेत. ७० वर्षीय अल्लीपुर सर्कल मधले वृद्ध शेतकरी बँक पीक कर्जा संदर्भातील तक्रार घेऊन आले असता महत्वाचे म्हणजे त्यांचा तरुण मुलगा सुद्धा मरण पावला आणि त्यामुळेच कुठल्याही प्रशाकीय,शासकीय कामासाठी त्यांना स्वतः जावे लागते आज त्यांचे संपूर्ण म्हणणे निवांतपणे समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांचं काम नक्कीच पूर्ण होईल असे आश्वासन दिले असता आजोबांच्या डोळ्यात आनदंश्रू बघून कार्यकर्त्याची मने हेलावून गेलीत. या परिसरातील ञस्त नागरिकांना कुठल्याही कामकाजासाठी इतर ठिकाणी चकरा न मारता संघटनेच्या वतीने त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करण्याची यावेळी कार्यकर्तानी प्रतिज्ञा केली.
यावेळी शिवराया विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विकास गोठे,रोषण नरड,निशांत लांभाडे हे उपस्थित होते.