Home महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे...

नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना*

487

*नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना*

(प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील मौजे जानापुरी येथील भुमीपुत्र शहीद सैनिक संभाजी कदम यांनी नगरोटा, जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती दिली. शहीद संभाजी कदम या वीर जवानाने संबंधित हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता व देशहित लक्षात घेत आतंकवाद्यांना ठार केले.
या सर्वोच्च बलिदानाचा विचार करून वीर शहीद जवान संभाजी कदम यांची वीरता, शौर्य व देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान व्यर्थ जाऊ न देता नांदेड जिल्हा, लोहा तालुक्यातील होत असलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देऊन शहीद सैनिकाचा मान-सन्मान वाढवावा, जेणेकरून सदर सर्वोच्च बलिदान सर्वांसाठी सदैव आठवणीत राहिल व पुढील युवा पिढीला सैन्यात सामील होण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या मागणीचे निवेदन
मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह, मा. मुख्यमंत्री, सैनिक कल्याण मंत्री, पालकमंत्री यांना शंभुसेना संघटनेचे अध्यक्ष श्री. दिपक राजे शिर्के, माजी सैनिक सुनील काळे, माजी सैनिक बाबासाहेब जाधव, माजी सैनिक आनंद ठाकूर, माजी सैनिक बालाजी चुकलवाड, सूर्यवंशी गोविंद, बापूराव कल्याणकर, पोचिराम वाघमारे, माणिकराव देवकते, शाहुजी तिडके, बळीराम जोंधळे, लक्ष्मण बनसोडे, एम.जी. शेख, रामचंद्र घोरबांड, शेंडगे साहेब, गारोळे साहेब, पेठकर साहेब, गणेश बारुळे, आनंदा नवघरे, आदी माजी सैनिक व पदाधिकाऱ्यांच्या सह्यासह निवेदन देण्यात आले.
शंभुसेना संघटनेच्या मागणीनुसार येणाऱ्या १५ ऑगस्ट ला स्वतंत्रता दिनानिमित्त सदर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देऊन खरी व श्रेष्ठ श्रद्धांजली द्यावी. अन्यथा नाईलाजास्तव शंभुसेना सामाजिक संघटना, माजी सैनिक विकास समिती महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्रातील तमाम आजी माजी सैनिक संघटना व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने राज्यस्तरीय आंदोलन उभारले असा इशारा शंभुसेना संघटनेचे अध्यक्ष दिपक राजेशिर्के व शंभुसेना नांदेडचे पदाधिकारी माजी सैनिक बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना सांगितले.