Home महत्वाची बातमी यावल येथिल वैद्यकीय शिबिरात ५४५ रुग्णाची तपासणी ३२७० कुटुंबाचे सर्वेक्षण

यावल येथिल वैद्यकीय शिबिरात ५४५ रुग्णाची तपासणी ३२७० कुटुंबाचे सर्वेक्षण

147

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील
यावल येथे वारीस फाउंडेशन व अँड वेल्फेअर सोसायटी यांनी जळगाव कोविड केअर युनिट च्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल येथे केले होते.

यात मिल्लत नगर, डांगपुरा, बाबूजी पुरा,खिरणी पुरा,इस्लाम पुरा, काझी पुरा,सरस्वती कॉलोनी,अकसानगर, मानियार वाडा, भोईटे वाडा, वाणी गल्लीतील व कॉलनीच्या ५४५ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून ३२७० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले
व या नागरिकांना मोफत औषधी व गोळ्या सुद्धा देण्यात आल्या.

*उद्घाटन सोहळा*
या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन नॅशनल शिक्षण सोसा चे अध्यक्ष हाजी ताहेर शेख चांद यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अंजुमन तलीमुल एज्युकेशन सोसायटीचे हाजी गफ्फार मलिक, जळगाव कोविड केअर युनिटचे फारुक शेख,तहसीलदार राजेंद्र कुवर,राष्ट्रवादी चे अनिल चौधरी, शब्बीर खान,मो याकूब सेठ,प्रा मुकेश येवले,अब्दुल हाफिज मजीद सह वारीस सोसायटीचे मो हकीम,हाजी अताउल्लाह खान,अय्युबखान ,हाजी हकीम खाटीक, हाजी आसिफ ,बशारत अली,डॉ शकील,अस्लम मेंबर,शेख करीम मानियार,रशीद खान,शेखअलीम,शेरखान,अब्दुल सत्तार, उस्मान ,डॉक्टर रागिब व अबूलयझ शेख आदी उपस्थित होते.
*उदघाटन कार्यक्रम*
उद्घाटन पर मार्गदर्शन करताना तहसीलदार कुवर यांनी समाजाला खरी गरज आज वैद्यकीय शिबिरांची असून त्यायोगे लोकांच्या मनातील भीती दूर करणे हा मुख्य उद्देश असून कोरोणाला आपण हरवू शकतो ही जिद्द प्रत्येकाने आपल्या मनात ठेवावी असे सांगितले.

अनिल भाऊ चौधरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले समयोचित भाषणे झाली.
*अध्यक्षीय भाषण*
कार्यक्रमाचे तथा कोविड केअर चे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकात्मते अंतर्गत मागील दोन महिन्या पासून आम्ही या डॉक्टरांना घेऊन फिरत असून सेवा देण्याचे कार्य करीत आहे व हे शेवट पर्यंत करू अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक शेख यांनी सादर केले. सूत्र संचालन डॉ शकील सईद तर आभार अय्युब खान सर यांनी मानले

*डॉक्टरांचा होता सहभाग*
जळगाव चे तज्ञ डॉक्टर
डॉ शरीफ शाह,डॉ आफ्रिन शेख,डॉ निलोफर शेख,डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर रियाज बागवान , डॉ अझीझुल्लाह शेख, डॉ अब्दुल रहीम,डॉ झाकीर पठाण, डॉ वसीम कुरेशी,डॉ अब्दुल वहाब शेख,डॉ फिरोज मानियार, यांनी सेवा दिली.
*यशस्वी ते चे योध्दा*
निजाम शेख, शेख शकील, युनूस खन्ना(यावल) *नोंदणी कक्ष* आमिर शेख,अर्षद खान,अकिल शेख,मुजाहिद शेख,मोहसीन शेख, अझहर हुसेन,अल्ताफ शेख(अल हिंद)आबिद शेख
*औशोधोपचार*अतिक अहेमद,अल्ताफ मानियार, फैझान अहेमद,मुशाहीद शेख,तौसिफ मानियार,हमजा अतिक,रफिक मानियार,हुजेफा अतिक यांनी परिश्रम घेतले