Home रायगड आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार

आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार

182

पनवेल – गिरीश भोपी

सामाजिक कार्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाने पुन्हा एकदा आपले कार्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. उरण तालुक्यातील पिरकोन-आवरे मार्गावरील पिरकोन गावाच्या हद्दीतील रस्त्यात खड्डे झाले होते. पावसामुळे हे खड्डे अधिकच धोकादायक झाले होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्या जनसामान्यांना त्याचा होणारा त्रास व संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन हे खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे होते. कोविड आणि लॉकडाऊनच्या जाचातून होरपळलेल्या जनतेचा त्रास कमी व्हावा यासाठी ‘आम्ही पिरकोनकर’ समूहातील सदस्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हे धोकादायक खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचा निर्णय समूहाने घेतला. केवळ तोंडी निर्णयावर न थांबता शनिवार दि. ०८ ऑगस्ट रोजी सिमेंट कॉन्क्रीटच्या साह्याने हे खड्डे बुजवण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार लागणार आहे. या कामात गिरीश म्हात्रे, रमाकांत जोशी, अशोक गावंड, अरुण पाटिल, गणेश गावंड, कल्पेश गावंड, प्रशांत म्हात्रे, प्रमोद पाटिल, शशिकांत गावंड, विलास गावंड, नरेश पाटिल, राजेंद्र ठाकूर, तेजस जोशी, वैभव पाटिल, नंदू म्हात्रे यांनी सहकार्य केले. तसेच यावेळेस महेंद्र गावंड, वैभव गावंड, मनोहर म्हात्रे, सुरेंद्र गावंड, भूषण गावंड, जयेश पाटिल, मनीष गावंड, विकास गावंड, विनायक म्हात्रे, मनोज जोशी, दीपक पाटिल आणि चेतन गावंड हे देखिल उपस्थित होते.आम्ही पिरकोनकर समूहाने राबवलेल्या या उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.