Home रायगड खालापूर कारागृह ( जेल ) व तहसील कार्यालय येथे पुस्तक लायब्ररीत नवीन...

खालापूर कारागृह ( जेल ) व तहसील कार्यालय येथे पुस्तक लायब्ररीत नवीन पुस्तकांचा Top Up

91

खालापूर..

अनेक गुन्हेगार कारागृहात सजा भोगण्यासाठी येत असतात.अशा वेळी रिकाम्या वेळात विचार करून भूतकाळात डोकावून वेळ घालविण्यापेक्षा विनोदी,प्रेरणादायी, आध्यात्मिक साहित्य तसेच कथा,चरित्र यासारखी पुस्तके वाचून प्रेरणा मिळावी व याच ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस स्टाफला देखील काही वेळ वाचन व्हावे या हेतूने सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खालापूर कारागृहात 15 ऑक्टोबर 2021 रोजी विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.


दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सदर पुस्तकांच्या लायब्ररीत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बाळा कुंभार यांच्या हस्ते पुस्तकांचे Top Up करण्यात आले.

तसेच तहसील कार्यालय,खालापूर येथे 23 मे 2022 रोजी शुभारंभ केलेल्या लायब्ररीत सुद्धा पुस्तकांचे Top Up करण्यात आले.
आजोबांच्या स्मरणार्थ काही पुस्तके उपलब्ध करुन देणाऱ्या कु.राज देशमुख यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,महिला संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक राजेंद्र फक्के,सल्लागार नरेंद्र हर्डीकर,उपक्रम प्रमुख प्रथमेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
खालापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी आभार मानताना सदर उपक्रमाने कैदी व कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांना नक्कीच वाचनातून आपला वेळ सत्कारणी लागेल असा आशावाद व्यक्त केला.