Home रायगड सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक विद्यालय, सावरोली येथे विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण मार्गदर्शन…

सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक विद्यालय, सावरोली येथे विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण मार्गदर्शन…

22

7 वर्षापासून शहरी व ग्रामीण भागात सातत्यपूर्ण उपक्रम

खालापूर…शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या 7 वर्षापासून सुरू असणाऱ्या या उपक्रमात सातत्य असून याच अनुषंगाने माध्यमिक विद्यालय,सावरोली येथे दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या, स्वरक्षणाचे महत्व, स्वच्छता असे अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुलांना अशा शिक्षणामूळे त्यांच्या पुढील वाटचालीस मदत होईल असा आशावाद इशिका शेलार यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात सहकार्य खा. ता. शि. प्र मंडळ,शालेय समिती अध्यक्ष श्री .चंद्रकांत केदारी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका.प्रज्ञा ठमके,सहशिक्षिका योगिता गुरव,भारती खालापुरकर, सुनिता देशमुख,
रा.जि.प सावरोली शाळेतील शिक्षिका
अंकिता चोगले व शिक्षकेतर स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम यशस्वी करण्यात सहज सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार ,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,सह सचिव नम्रता परदेशी,सह खजिनदार बनिता सहा,महिला संघटक नीलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक राजेंद्र फक्के तसेच सल्लागार नरेंद्र हर्डीकर,अष्पाक लोगडे,गणेश राक्षे,दिवेश राठोड,उबेद पटेल,अशोक ठकेकर,तुषार अगरवाल तसेच सागरिका जांभळे व कुणाल काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.