Home रायगड रिलायन्स फाऊंडेशन स्कुल लोधिवली एॕडमिन विनय सिंग यांच्या वर खालापूर पोलीस ठाण्यात...

रिलायन्स फाऊंडेशन स्कुल लोधिवली एॕडमिन विनय सिंग यांच्या वर खालापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल.

18

रायगड – रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवली येथिल एॕडमीन विनय सिंग यांनी मुख्याध्यापक यांच्या समोर अमोल सांगळे यांना 6 एप्रिल 2024 रोजी मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावत जाऊन अर्वाच्य भाषेत शिव्या व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मुख्याध्यापक यांच्या समोर घडला होता.

क्रोधाने बेभान झालेल्या विनय सिंग यांना मुख्याध्यापक सर यांनी मागे खेचले अन्यथा यावेळी अनर्थ घडला असता.

संस्थेत काम करत असतांना यापुढे भविष्यात विनय सिंग यांन कडून अमोल सांगळे यांच्या जिवितास धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

तक्रारदार संस्थेचा कामगार असल्यामुळे संस्थेचे अधिकारी व अध्यक्षा यांन कडे तक्रार केली होती. परतु 30 दिवस होऊन ही तक्रारीची दखल न घेतल्याने फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रारदार यांनी खालापूर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज सादर करत तो प्रत माहिती व उचित कार्यवाही होण्यासाठी पोलीस अधिक्क्षक रायगड व शासनास सादर केलेला होता.

रिलायन्स फाउंडेशन स्कूल इंग्लिश मिडीयम लोधिवली येथील ऑफिस अँडमिस्ट्रेटर विनय सिंग यांनी शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी दिल्या बाबत मा. पोलीस अधीक्षक साो, रायगड अलिबाग यांच्याकडे केलेल्या तकारी अर्ज हा पुढील चौकशी कामी खालापूर पोलीस ठाणे येथे दाखल झाल्यानंतर त्या तक्रारी अर्जाचे अनुषंगानेच खालापूर पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा रजि. नंबर 411/2024, भादवि कलम 504, 506, प्रमाणे तो 03/6/2024 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. सदरील गुन्हा नोंद झाल्याची माहिती तक्रारदार अमोल सांगळे यांना पोस्टाने पाठविण्यात आलेल्या पत्राद्वारे १ जुलै रोजी दुपारी प्राप्त झाली…