Home बुलडाणा चेक पोस्टवर थर्मलगणच नाही , पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करणार तरी...

चेक पोस्टवर थर्मलगणच नाही , पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करणार तरी कशी होणार..!

278

जमीर शाह

औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावरील डोणगांव मालेगाव रोडवर असणाऱ्या चेकपोस्टवर ताप
तपासण्यासाठी थर्मलगणच नाही.
जिल्हात येणाऱ्यांचे थर्मलगणने तपासणी करणे अनिवार्य असतांना दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या चेकपोस्टवर थर्मलगणच नाही.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा अधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्ह्याच्या सीमा सील करून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची तपासणी करून आत सोडावे असे आदेश देण्यात आले यासाठी प्रत्येक चेकपोस्टवर दोन पोलीस कर्मचारी आणि दोन शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली चेकपोस्टवर असणाऱ्या शिक्षकांनी बाहेर जिल्ह्यातून बुलढाणा जिल्हात प्रवेश करणाऱ्याचे थर्मलगणने टेम्प्रेचर पाहूनच आत सोडावे असे आदेश असतांना डोणगाव येथील मालेगाव रोडवरील चेक पोस्टवर थर्मलगणच नसल्याने येणाऱ्यांचे टेम्प्रेचर तपासल्याच जात नसल्याचे दिसून आले तर शिक्षकांच्या नियुक्त्या सुद्धा १२ तासासाठी करण्यात आलेल्या आहेत.
बुलढाणा जिल्हात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या चेकपोस्ट वर आपले लक्ष केंद्रित केले जिल्हात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गादीवर कोठून आले व कोठे जायचे,त्यांच्या जवळ असलेला परवाना तपासणे व येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजूनच आत सोडायचे असे आदेशात केले यात जिल्हात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सियस पेक्षा जास्त नको जर प्रवेश करणारी व्यक्तीला ३८ अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान असेल तर त्या व्यक्तीची माहिती नजीकच्या आरोग्य केंद्राला द्यायची असे स्पष्ट आदेश असतांना सुद्धा मेहकर तालुक्यातील औरंगाबाद नागपूर मार्गावरील बुलढाणा जिल्हाच्या प्रवेश द्वारावर असणाऱ्या मालेगाव रोडवरील चेकपोस्टवर ६ जुलै रोजी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी थर्मलगणच नव्हती एकीकडे हे चेकपोस्ट अकोला व वाशीम जिल्ह्याला जोडणारी आहे तेव्हा त्या ठिकानवरून जिल्हात येणाऱ्या लोकांचे थर्मलगणने तपासणी व्हायला हवी मात्र या ठिकाणी थर्मलगणच नाही.
चेकपोस्टवर असणाऱ्या शिक्षिका कडून थर्मलगण संदर्भात माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की आम्हाला दिलेल्या पत्रात सांगितलेले आहे की जिल्हात येणाऱ्यांचे थर्मलगणने तापमान घ्यायला हवे मात्र थर्मलगणच नाही तर थर्मलगण कशी वापरायची या बद्दल सुद्धा माहिती देण्यात आलेली नाही तर शिक्षकांच्या नियुक्त्या ८ तासा ऐवजी १२ तास करण्यात आलेल्या आहेत जेव्हा येणाऱ्याच्या शरीराचे तापमान घेण्या साठी थर्मलगणच नाही तेव्हा शिक्षकांच्या नियुक्तीचा फायदा काय असा प्रश्न निर्माण होत आहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांच्या शरीराचे तापमान तपासूनच जिल्हात सोडायला हवे होते मात्र थर्मलगणच नसल्याने बाहेरून येणाऱ्यांची तपासणी करणारच कशी.