August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मंत्री जी असा कसा हा लोकडाऊन???

या अश्या लोकडाऊनमूळे करोना ची चैन तुटणार का???

अमीन शाह

आज बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांनी फारच घाई गडबडीत पत्रकार परिषद घेऊन बुलडाणा जिल्ह्यात अर्धा दिवसाचा लोकडाऊन घोषित केले आहे सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरू राहणार म्हणजेच सर्व दुकानावर सामान घेण्यासाठी निश्चितच गर्दी होणार ग्रामीण भागातील लोक शहरी भागात खरेदीसाठी येणार सध्या जिल्ह्यात मुंबई , पुणे , सुरत , औरंगाबाद , येथून अनेक कामगार आपल्या मूळ गावी परतले आहेत. या सर्व शहरात करोना विषाणूचा अधिक प्रकोप सुरू आहे , आपल्या म्हणण्या नुसार केरोना ची चैन तोड्याची आहे मग अश्या अर्ध्या दिवसाच्या लोकडाऊनमूळे करोना ची चैन कशी तुटणार ??? हा मोठा प्रश्न आहे. आपल्याच मतदार संघात देऊळगावराजा , सरमबा साखरखेरडा , गारखेड येथे कोरोना चा प्रकोप सुरू असून रोज रुग्ण संख्या वाढत आहे येथे खास उपाय योजना करण्याची गरज आहे असे मला वाटते.

बुलडाणा येथे स्वब टेस्टिंग प्रयोग शाळा सुरु करण्याचा जो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठविला आहे तो निर्णय अभिनंदनास पात्र आहे परंतू लोक मास्क वापरत नाही सोशल डिस्टनसिंग पाळत नाही या वर आपण चिंता व्यक्त केली चांगली बाब आहे परंतु साहेब सर्व प्रशासन यंत्रणा आपल्या हातात आहे , कोणी जर नियम पाळत नसेल तर आपण त्या यंत्रणेला आदेश द्या मग पहा कसा सर्व काही सुरळीत होते ते साहेब अश्या अर्ध्या दिवसाच्या लोक डाऊनमूळे कोरोना चा धोका टळणार नाही करोना ची चैन तुटणार नाही . सध्या जालना , औरंगाबाद ला ज्या पद्धतीने लोकडाऊन सुरू आहे तसा लोकडाऊन आपल्या जिल्ह्यात ही करावा लागेल तरच या भयनकर करोना ची चैन तुटेल ??

लोक घरीच थांबणार कोरोना ही थांबणार ,
जिल्ह्यातील माझ्या सर्व भाऊ बहनी ना माझी एकच विनंती आहे की कितीही मार्केट , बाजार , दुकाने सुरू असली तर हरकत नाही मात्र आपण बाहेर पडू नका जास्त गरज पडली तरच बाहेर पडा नाहीतर घरी रहा सुरक्षित रहा

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!