Home बुलडाणा डांबराची गोळी खाल्ल्याने चिमुकल्या बालकाचा मृत्यू

डांबराची गोळी खाल्ल्याने चिमुकल्या बालकाचा मृत्यू

125
0

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

बुलडाणा , दि. १९ :- घरात असलेली डांबराची गोळी खाल्ल्याने अडीच वर्षे बालकाचा मृत्यू झाल्याची घटना निमगाव येथे घडली. रहिवासी नांदुरा तालुक्यातील खामगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक समाधान बळीराम जामोदे यांचा नातू चिरंजीव ऋग्वेद निशांत जामोदे वय अडीच वर्ष याने १४ फेब्रुवारी रोजी कळत नकळत घरात असलेली डांबराची गोळी खाल्ली, नंतर दोन दिवस त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही, १६ फेब्रुवारी रोजी त्रास होताच त्याला प्रथम नांदुरा येथील डॉ. अनंत खेडकर यांचेकडे उपचारार्थ नेले असता, त्यांनी ऋग्वेदला अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्याचे सांगितले. अकोला येथे त्याच्यावर उपचार करूनही प्रकृतीत कोणत्या प्रकारची सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला होप हॉस्पिटल अमरावती येथे रेफर करण्यात आले होते. त्याला उपचारार्थ अमरावती येथे दाखल केले असता अमरावती येथील डॉक्टरांनी बालकास मृत घोषित केले. मृतक ऋग्वेदच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, आबा, आजी, असा बराच आप्तपरिवार असून सदर घटनेने निमगावसह पंचक्रोशीत दुःखाचे सावट पसरले होते . यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ एकडे यांनी मृतक ऋग्वेदाच्या कुटुंबास सांत्वनपर भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Unlimited Reseller Hosting