Home बुलडाणा महादू लहाने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

महादू लहाने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

203

दरवर्षी बुलढाणा जिल्हा परिषदे कडून शैक्षणीक, सामजिक , सांस्क्रुतिक व राष्ट्रीय कामाच्या आधारे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी सावखेड नागरे गावचे सुपुत्र महादू लहाने यांना जाहीर झाला आहे.

तौसिफ शेख 

मलकापूर पांग्रा : महादू लहाने हे जिल्हा परिषद शाळा मलकापूर पांग्रा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.यापूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव,झोटिंगा येथे त्यांनी उत्तम सेवा केली आहे व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत आणि यामुळेच़ ज्या शाळेमध्ये लहाने यांनी काम केलं त्या गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी त्यांचा सन्मान केला आहे.
सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा शाळेमध्ये कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत त्याच बरोबर सामजिक बांधिलकी म्हणून गावातील तरुण मुलांना करियर मार्गदर्शन , बचत गटांना मार्गदर्शन, तरुण मंडळांना सहकार्य , अंधश्रद्धा निर्मूलन, क्रीडा विषयक मार्गदर्शन, व्यसन मुक्ती, सामाजिक शैक्षणिक प्रबोधन, व्याख्याने, दारूबंदी,बेटी बचाव,लेक शिकवा, गडकिल्ले संवर्धन साठी मार्गदर्शन करून सामजिक बांधिलकी जपली आहे.*
सध्या जगावर आलेल्या कोरोना महामारी मध्ये गावामधे सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्तम्क उपाययोजना राबवण्यास पुढाकार घेतला.यापुर्वी त्यांना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

महादू लहाने यांच्या सर्वांगीण कामाची दखल घेत जिल्हा परिषद बुलढाणा यांनी य़ा वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.