Home विदर्भ श्री . दिलीप वळसे पाटील गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत निवेदन…!

श्री . दिलीप वळसे पाटील गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत निवेदन…!

170

यवतमाळ – जिल्हाधिकारी यवतमाळ यांना राज्य पोलीस दलातील सन २०१४ पासून रखडलेली राखीव पोलीस निरीक्षक ( RPI ) यांना सशस्त्र पोलीस उपअधिक्षक ( R – DYSP ) तात्काळ पदोन्नती देणे बाबत पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सन २०१८ पासून गेली ३ वर्षे वारंवार गृहखात्याला व पोलीस महासंचालक साहेबांना तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना देखील निवेदने देवून या राखीव पोलीस निरीक्षकांची ( RPI ) सशस्त्र पोलीस उपअधिक्षक ( R – DYSP ) पदी पदोन्नती करण्यात यावी म्हणून सतत पाठपुरावा करत आलो आहोत . तरी अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. निवेदन देतांना ‌ शाहेद शकील सैय्यद (विदर्भ अध्यक्ष ) पोलीस बॉईज़ असोसिएशन , महाराष्ट्र यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असुन पोलीस बॉईज़ असोसिएशनच्या या मागणीची दखल घेवून जिल्हा पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक ( RPI ) यांना सशस्त्र पोलीस उपअधिक्षक ( R – DYSP ) या पदावर पदोन्नती करिता मा.पोलीस महासंचालक साहेब , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी ( कक्ष -26 ब ) यांची कार्यालयामार्फत गृहविभाग , महाराष्ट्र राज्य येथे पदोन्नती बाबतचा प्रस्ताव पाठवला आहे . सदर बाबत मा.पोलीस महासंचालक साहेबांनी त्यांचे फेसबुकचे मार्फत स्वतः माहिती दिली आहे . तरी मा. गृहमंत्री साहेबांनी या विषयाकडे स्वत : जातीने लक्ष घालून या प्रस्तावाचा प्राधान्य क्रमांक देवून त्यांची पदोन्नती करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे‌. यावेळी प्रकाश उदासी प्रसिद्धी प्रमुख , प्रशिक गडलिंग अँड . रजनीताई देवतळे , विधी सल्लागार प्रामुख्याने उपस्थित होते .