Home बुलडाणा सलग 13 वर्षापासून मलकापूर पांग्रा येथे थर्टी फर्स्ट चा जल्लोष दूध पिऊन...

सलग 13 वर्षापासून मलकापूर पांग्रा येथे थर्टी फर्स्ट चा जल्लोष दूध पिऊन साजरा ’ करण्याची परंपरा

138

 

 

 

भगवानराव साळवे 

सिंदखेडराजा ,

कोरोना चा वाढता धोका बघता आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत यावर्षीही 2021 ला निरोप देन्यासाठी नवीन वर्षयाचे स्वागत दारू पिऊन ‘झिंगाट’ न होता तरुणाईने शराब नही दूध पिऐंगे मरीज नही सशक्त बनेंगे असे म्हणत तरुणाईने मलकापूर पांग्रा येथे थर्टी फस्टला नव वर्षाचा जल्लोष आरोग्यसंपन्न होत साजरा केला सलग तेरा वर्षापासून मलकापूर पांग्रा येथे एकतीस डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दूध पिण्याचा उपक्रम राबविला जातो या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत होते

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 2009 ला मलकापूर पांग्रा येथे दिवंगत प्रताप देशमुख पत्रकार भगवान साळवे यांच्या संकल्पनेतून शराब नही दूध देंगे हा उपक्रम राबविण्यात येतो कोरोणाच्या महामारीमुळे वर्षभरापूर्वी प्रताप देशमुख यांचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी अनघा देशमुख पत्रकार भगवान साळवे, वसीम शेख, मिलिंद आंभोरे, डॉ डोडिया ,पोलीस पाटील पांडुरंग सोनुने, शेख जलील ,रफीक खां आदींनी ही परंपरा खंडित न ठेवता कोरणा च्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने तरुणांना दूध पाजून थर्टी फस्ट जल्लोष साजरा करण्यात आला तरुणाईने संध्याकाळी दारू न पिता ‘दूध’ पिऊन ३१ डिसेंबर साजरा केला. तेरा वर्षापासून मलकापूर पांग्रा येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिसवे यांच्या उपस्थितीत हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला होता त्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम घेऊन हजारो तरुणांना दूध पाजून नववर्षाचे स्वागत करण्यात येते यावर्षी कोरोना ची पार्श्वभूमी बघता हा उत्सव छोटेखानी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार भगवान साळवे यांनी करून तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहावे असे आवाहन केले यावेळी तरुणांना दूध वितरण करण्यात आले