Home मराठवाडा संतसाहित्याची उपयुक्तता त्रिकालाबाधित आहे – डॉ.जयश्री किनारीवाल  

संतसाहित्याची उपयुक्तता त्रिकालाबाधित आहे – डॉ.जयश्री किनारीवाल  

299

गंगा महाविद्यालय कुंभेफळ येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना- संतसाहित्य हे सर्वकालीन आहे.अगदी प्राचीन कालीन वेद उपनिषदांमधील तत्वज्ञान हे आजही तेव्हडेच उपयुक्त आहे जेव्हढे त्या काळात होते.या वेदांचा आश्रय घेऊनच साधू संतानी आपल्या प्रांताच्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल,रुचेल अशा शब्दात ते तत्वज्ञान मांडले आहे म्हणूनच संतसाहित्याची उपयुक्तता ही त्रिकालाबाधित आहे,असे प्रतिपादन “वर्तमान परिस्थितीत संतसाहित्याची उपयुक्तता” या विषयावर चैतन्य साधना व संशोधन प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.जयश्री किनारीवाल यांनी केले.

वैश्विकीकरणाची संकल्पना मूळ भारतीय संस्कृतीची असून ती जगाला दिलेली भारताची देन आहे.“वसुधैव कुटुंबकम”, “हे विश्वाची माझे घर ! ऐसी मती जयाची स्थिर !किंबहुना चराचर !आपणची जाहला !!” ही संतांची शिकवण आहे.तेराव्या शतकापासून ते आजतागायत महाराष्ट्रात संतसाहित्य हे परिपूर्ण साहित्य असून मानवी जीवनाला समृद्ध करण्याची ताकत त्यात आहे,असे डॉ.किनारीवाल म्हणाल्या.

कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक व गंगा महाविद्यालय कुंभेफळ,औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “तंत्रज्ञानाचा वापर व एकात्मता” याविषयावर दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसीय अंतराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक राजेंद्र खंडेलवाल हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे कुलसचिव डॉ.रामचंद्र जोशी यांनी केले.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सुनील कुलकर्णी, प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे अधिव्याख्याता डॉ.प्रमोद कुमावत,संत साहित्याच्या अभ्यासिका डॉ.जयश्री किनारीवाल,अमेरिकेतून योगशिक्षक संतोष माखनिकर उपस्थित होते.हे चर्चासत्र ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने संपन्न झाले.

संतसाहित्यात ही अनेक जीवन कौशल्ये असून विशेष संवाद कौशल्यावर भर देताना डॉ.सुनील कुलकर्णी यांनी अनेक उदाहरणे दिली.जसे कीर्तनकार दोन-तीन तास श्रोत्यांना एकाच जागेवर खेळून ठेवतो त्याचे कारण त्यांच्यात संवाद कौशल्य चांगले असते.साहित्यात भ्रमरगीत मध्ये भगवान श्रीकृष्ण व गोपिकांमध्ये झालेला संवाद आहे,भगवद्गीतेत श्रीकृष्ण व अर्जुन संवाद आहे त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला बोलण्यापुर्वी  सावध करतात “तरी अवधान एकले दीजे ! मग सर्व सुखासी पत्र होईजे !हे प्रतीज्ञोतर माझे !उघड ऐका !!”संत ज्ञानेश्वर व त्यांचे गुरु श्रीनिवृत्तीनाथ यांच्यात संवाद आहे.अनेक उपनिषदांमध्ये गुरु शिष्य संवाद आहे.हे सर्व संवाद कौष्यल्य आत्मसाद करून आजच्या जीवनात आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो असेही ते म्हणाले.

डॉ.प्रमोद कुमावत यांनी तंत्रज्ञान युगात आपले मानसिक आरोग्य कसे सांभाळावे यावर प्रकाश टाकला.तर अमेरिकेतून योगाविषयी माखानिकरानांनी योगाचे महत्व सांगितले.कार्यक्रमाला साहेबराव कुमावत,अर्चना सोडाणी,पूनम शर्मा,प्रा.अरुण आहेर,यांच्या सह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.