Home साहित्य जगत नव वर्षा रे ..”नव शुभेच्छा..”

नव वर्षा रे ..”नव शुभेच्छा..”

295

नव वर्षा रे ..

परत जाय एक वीस
असे आसवे गाळीत
सालभर छळछळले
का केले गर्भगळीत

घंटानाद केला कधी
मजा टाळी थाळीत
मनाने घट्ट राहिलो
संपर्क राही टाळीत

येत राही पाठोपाठ
संकटे एका ओळीत
महागाई ती पेटलेली
राही सदैव जाळीत

अर्थ व्यवस्था भ्याली
ते प्रकल्प अडगळीत
आश्वासने शब्द फक्त
ते झाले मिळमिळीत

झगडले युध्द योध्दा
ना झाले डळमळीत
शिस्तबद्ध जीवन हो
नियमकायदे पाळीत

नवीन वर्षा स्वागतम्
वेलकम खेळीमेळीत
सिध्द झाला माणूस
काय तुझ्या झोळीत

नव शुभेच्छा..

कोंदणी राहो सदैव
ही एकतीस डिसेंबर
स्वागत निरोप दोन्ही
सजवा सुंदर धरोवर

आळवू सुरेल सुस्वर
गोंगाट नकोरे भेसूर
माणसे ही सुसंस्कृत
नाहीरे आपण असूर

स्वागतनिरोप समयी
नको नशेत त्या चूर
जुन्या वर्षास जाता
वाटाया हवी हुरहूर

स्वच्छ निरामय मने
प्रेमेभरून यावा ऊर
जळमटे झटका सर्व
नको दाटायला धूर

जुन्या वर्षाने म्हणावे
राहावे इथेचं क्षणभर
नवीनवर्षाला वाटावे
यावे आतां लवकर

–हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com