Home साहित्य जगत शब्दांची मुक्त उधळण करणारा अवलिया : सुरेश भट

शब्दांची मुक्त उधळण करणारा अवलिया : सुरेश भट

419

मराठी साहित्यात गझल या काव्य प्रकारास खऱ्या अर्थाने उंची प्राप्त करून देणारे कवी, गझलकार सुरेश भट यांचा 15 एप्रिल हा जन्मदिन!
15 एप्रिल 1932 रोजी अमरावती येथे जन्मलेल्या या सारस्वतपुत्राने मराठी साहित्य विश्वात एक वेगळा प्रवाह रूढ केला. रुपगंधा, एल्गार, रंग माझा वेगळा, झंझावात या एकापेक्षा एक दर्जेदार काव्य संग्रहाने रसिकांची मने काबीज केली.

“माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे,
वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे “

ही शब्दांची किमया फक्त शब्दांचा जादूगारच करू शकतो!

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली…
हे अजरामर गीत प्रेमाचं अस्सल अभिव्यक्तिकरण.

“रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती: रोज तुझ्या
भेटीसाठी बाहू आसवांचे होती!”
प्रेमआराधनेचा केवढा हा भव्य
अविष्कार!

जीवनाच तत्वज्ञान अवघ्या दोन ओळीत हा किमयागार टिपतो
“मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते”. जीवन फकिरासारख मोह विरहित जगता आल पाहिजे ही जाणीव करून देताना हा जादूगार म्हणतो,
“रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा “
मोहरून टाकणारे शब्द… सच्चा भावना… त्यागा पलीकडील प्रेम… संघर्षाला मखमली तारुण्यात लपेटून ही जखम सुगंधी करणारा सृजनाचा अविष्कार जरी आज आपल्यात नाही पण माझ्या सारख्या असंख्य तरुणांना त्या वेळी जगण्याच वेड यान लावल!!
“शब्दांचा तो खऱ्या अर्थाने प्रभू ठरला!”
आज त्यांच्या पावन स्मृतीस ही शब्दांजली 

लेखक
 निखिल थारकर (शिक्षक)
अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ 8888287497