
तुझ्या चुकीच्या वक्तव्यावर टाळी ठोकत जाऊ डोक्याने मी खुळा पांगळा मुळीच नाही भाऊ
शिक्षण, पाणी, रोजगार अन् आरोग्यावर बोला धर्माची ही गोळी आता चालत नाही खाऊ
कळते सारे जनतेला … ती वेडी नाही बाप कुणाचा कुणी चोरला कुणी कुणाचा भाऊ
जनतेशी ही खेळी ऐसी चालत नाही सहसा जेव्हा जेव्हा खेळी झाली तख़्ता पलटत जाऊ
झोला आता उचलायाचा गाठायाचे स्टेशन स्टेशनवरती चाय गरमचे गाणे तितके गाऊ
भजी पकोडे तळण्याइतके शिक्षण सोपे नाही आयुष्याचा घाणा होतो डीग्रीसाठी ताऊ
सौ. ज्योती रितेश उमरेडकर










































