Home साहित्य जगत अजीम नवाज राही यांच्या कवितेचा संत गाडगेबाबा अमरावतीच्या बी ए च्या अभ्यासक्रमात...

अजीम नवाज राही यांच्या कवितेचा संत गाडगेबाबा अमरावतीच्या बी ए च्या अभ्यासक्रमात समावेश

655

 

अमीन शाह

बुलढाणा ,

महाराष्ट्र राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन क्षेत्रातील वलयांकीत नाव प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या वाड्मयीनक्षेत्रात गाजलेल्या आणि अनेक मातब्बर पुरस्कारांचं
मानकरी ठरलेल्या कल्लोळातला एकांत या कवितासंग्रहातील विमान नावाच्या कवितेचा समावेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे,

आमच्या प्रतिनिधीने उपरोक्त समावेशाबद्दल अजीम नवाज राही यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ ममता इंगोले,प्राचार्य डॉ गजानन भास्करराव जाधव, डॉ गजानन मुंदे यांचे कवितेच्या समावेशाबद्दल मनःपूर्वक आभार मानले, आभार मानताना अजीम नवाज राही म्हणाले हे सगळं कवितेचं पर्यायाने माय मराठीचं भरघोस देणं आहे, निवड करणाऱ्या मंडळीची साहित्याविषयीची निकोप आणि चोखंदळदृष्टीचे फलीत आहे,

इयत्ता 10 वी इयत्ता 11 वी च्या पाठयपुस्तकात कवितांच्या समावेशानंतर
महाराष्ट्र राज्याच्या 9 नऊ विद्यापीठात अजीम नवाज राही यांच्या व्यवहाराचा काळा घोडा,
वर्तमानाचा वतनदार, कल्लोळातला एकांत या तीन कवितासंग्रहांचा आणि कवितासंग्रहातील आशयघन कवितांचा समावेश करण्यात आला आहे, नव्वदोत्तरीनंतर मराठी कवितेत ज्या कवींची नावे ताकदीने पुढे आली त्या नामावलीत अजीम नवाज राही यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं,
त्यांच्या कवितेत गावमातीत राबणाऱ्या परिघावरच्या कष्टकरी,शेतकरी,शेतमजूर, कामगार,सर्वहारावर्गाच्या पिचलेल्या, नाकारलेल्या वस्तुनिष्ठ वेदना बोलक्या होतात,
सर्वसामान्य माणसाच्या कष्टाळू दैनंदीनीला कंठ फुटतो,सर्वहारा समूहाची सच्ची दुःखलय घट्टपणे पाळेमुळे रुजवते, त्यांचा अख्खा शब्दप्रवासआशयघन, वस्तुनिष्ठ,अस्सल सल असलेला,जगणे व कवितेचे एकरुपत्व अधोरेखित करणारा आहे, कुठलाही आडपडदा न ठेवता जे भोगलं, जे सोसले ते हातचा न राखता त्यांनी बिनधास्त कवितेत मांडलं म्हणून अजीम नवाज राही यांची कविता अंतर्बाह्य पारदर्शी ठरली, निखळ मानवीमूल्यांची जपणूक त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे, व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत आणि वर्तमानाचा वतनदार या तीन सकस ,दर्जेदार कवितासंग्रहांना आजवर अमेरिकेतील फाउंडेशन आणि भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मयलेखनाचा कवी केशवसूत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार,इंदिरा संत पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, भि ग रोहमारे पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, ना घ देशपांडे पुरस्कार
इत्यादी मातब्बर पुरस्कार मिळाले आहेत, वाणीच्या क्षेत्रात श्रोताप्रिय निवेदक या नात्याने राज्यभर भटकंती करणाऱ्या अजीम नवाज राही यांचा चवथा कवितासंग्रह तळमळीचा तळ
जळगावच्या अथर्व प्रकाशनने नुकताच प्रकाशित केला असून तळमळीच्या तळाचे वाड्मयीन मुलखात उत्स्फूर्त स्वागत होत आहे,