Home नांदेड तळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

तळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

267

राजेश एन भांगे

नांदेड, आज तळेगाव उमरी ता. येथे गोरठेकर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन डॉ. विक्रम देशमुख व उमरी पंचायत समिती उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम गावातील गरजु व्यक्तींना राशन वाटप करण्यात आले, त्यानंतर गावातील रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक असणार्या कोविड १९ किट मोफत वाटप करण्यात आल्या.

व सध्या कोरोनाच्या या महाभयंकर परीस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
अशा परीस्थितीत तळेगाव येथील सर्व युवक वर्ग पुढाकार घेऊन आज या रक्तदान शिबीरामध्ये भाग घेऊन रक्तदान करुन योगदान युवकांनी दिले आहे.

तसेच यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. विक्रम देशमुख, उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, मध्यवर्ती बँक नवनिर्वाचित संचालक कैलास देशमुख गोरठेकर, तळेगाव जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी आनंदराव यल्लमगोंडे, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा या अभियानाचे मुख्य संयोजक डॉ.अमोल पाटील ढगे, उमरी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव देशमुख तळेगावकर, युवा नेते विश्वजीत देशमुख, विद्यार्थी आघाडी उमरी तालुका अध्यक्ष विलास लोहगावे,
सतिषराव देशमुख, बि. व्हि. खदगाये सर, मा. सरपंच रामराव कप्पावार, लालु यंगुलवार, गटनेते रमीज बेग, मोगल मुजम्मील पटेल, संभाजी पा. जाधव, विलास आम्रतवाड, प्रकाश मठपती, रमेश हैबत्ते, केदार आम्रतवाड, गोविंद पांचाळ, सुरेश गोटमुखले, मा. सरपंच गंगाधर शिगळे, गोविंद पांचाळ, दिगांबर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.