Home नांदेड नांदेड -भीषण अपघातात दोघे ठार ऐकाची प्रकृती चिंताजनक.

नांदेड -भीषण अपघातात दोघे ठार ऐकाची प्रकृती चिंताजनक.

32

दहेली गावानजीक काळाने घातला झडप.

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

दि.०२:- सारखणी मांडवी रोडवर दहेली गावानजीक आज दिनांक ०२ मार्च रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान एका वळणावर बुलेट गाडीवर जाणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला त्यात दोघे ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळली आहे.आज बारावीची परीक्षा देऊन आपल्या दहेली गावा कडे जात असताना दहेली गावा नाजीकच्या वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार, या विद्यार्थ्यांचा बाभळीच्या झाडावर बुलेट गाडी धडकल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. वेळीच दहेली गावचे सरपंच राकेश तोटावर यांनी वाहन करून प्राथमिक विलाज करण्यासाठी दहेली तांडा येथे या तिघांनाही दाखल केले तेथून प्राथमिक विलाज करून ॲम्बुलन्स च्या साह्याने यवतमाळ येथे हलवण्यात आले यवतमाळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार यांना मृत घोषित केल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
तर गणेश तोटावर या विद्यार्थ्या च्या पायाला जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे.
अगदी गावाजवळ येऊन हा भीषण अपघात झाल्याने दहेली गावावर शोकाकुल वातावरण पसरले आहे.
दहेली गावानजीकच्या वळणावर आज पर्यंत अनेक अपघात झाले असून या रस्त्यावर अपघात प्रवण स्थळ असे दर्शवणारे एकही फलक नसून या वळणावर दोन्ही दिशेने गतिरोधक टाकण्याची मांगणी दहेली येथील उपसरपंच राकेश तोटावर यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित होत आहे.