Home विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचा एल्गार…..

वैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचा एल्गार…..

387
0

सर्वसामान्य रुग्णांचे हाल….

खाजगी रुग्णालयावर मनसे वचक ठेवणार….

बेड सुविधा आणि रेमडेसिव्हर माहिती प्रसिद्ध करा….

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून अश्या परिस्थितीत वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे.रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाबाबत कोणतीच माहीत पुरविण्यात येत असून अनेक प्रकरणात मृतदेहाची अदलाबदल आणि मृत व्यक्तींचे माहीत सुद्धा उपलब्ध होत नाही आहे अश्या परिस्थितीत जिवंत रुग्णांचा कोण वाली…? रुग्णालयाच्या अनेक वॉर्डात रुग्णांबाबत उपचार केल्याचा आव आणल्या जात असून मुळात रुगणांकडे गांभीर्याने कोणीच लक्ष देत नसल्याचा आरोप अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी मनसे कडे केलेल्या तक्रारीत केला आहे.हा सर्व विषय गंभीर स्वरूपाचा असून यावर कडक कार्यवाही करत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत सोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची रोज माहीत उपलब्ध व्हावी अशी व्यवस्था करावी आणि प्रत्येक कोरोना वॉर्डात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत जेणे करून रुग्णांचे होणारे हाल होणार नाही आणि संबंधित यंत्रणेवर वचक राहील अश्या स्वरूपाची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली.
या सोबतच जिल्ह्यात रेमडेसिव्हर चा तुटवडा सुरू असून गरजू लोकांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही आहे परिणामी लोकांना काळाबाजारात आपल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी १० ते १५ हजारावर इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यात सर्वसामान्य जनतेची लूट सुरू असून काही दवाखाने तर रुग्णांचे बिल ५ ते ७ लाखाच्या वर काढत आहे.संबंधित रुग्णांलयावर कोणाचेही नियंत्रण नसून या रुगणालायत उपलब्ध बेड ची माहिती रोज प्रसिद्ध करावी जेणे करून सर्वसामान्य नागरिकांना बेड साठी होणारी फरफट थांबेल, यवतमाळ जिल्ह्यात अनेक रुगणालयांना कोविड उपचाराची परवानगी नसतांना सुद्धा इतर रुगणांच्या कोणत्याही प्रकारची कोणतीही काळजी न घेता सरसकट इतर रुग्णांसोबत त्यांच्यावर उपचार सुरू आहे असा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला..या सर्व गंभीर विषयांवर आपण तात्काळ पावले उचलावी आणि या महामारीच्या काळात जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या भ्रष्ट लोकांवर कडक कार्यवाही व्हावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा मनसे कोरोना काळात जनतेची हाल आणि लूट करणाऱ्या यंत्रणेला धडा शिकवेल आणि वचक ठेवेल.सोबतच जनतेने कोरोना रुग्णासंदर्भात काही अडचणी आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे संपर्क करावा आणि रेमडेसिव्हर चा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती द्यावी असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.या सह कोरोना काळात रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा पातळीवर एक केंद्र उभारून त्यात सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध करावी, आणि खाजगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा बिल देण्यात येत आहे या वर उपाय योजना म्हणून सर्व रुग्णांचे बिल विभाग हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीन घ्यावा जेणे करून रुग्णांची लूट थांबेल आणि जनतेला दिलासा मिळेल अशी मागणी ही या चर्चे दरम्यान करण्यात आली.या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, विकास पवार, अभिजित नानवटकर , यासह इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होत.