Home मराठवाडा कोरोनामुळे निधन झालेले पत्रकार मिलिंद वाघमारे यांच्या कुटुंबाला दैनिक लोकपत्रकडून लाखाची मदत

कोरोनामुळे निधन झालेले पत्रकार मिलिंद वाघमारे यांच्या कुटुंबाला दैनिक लोकपत्रकडून लाखाची मदत

375
0

जालना – लक्ष्मण बिलोरे

राज्यात कोविड – १९ या आजाराने हाहाकार माजविला असून गेल्या वर्षभरात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ११० पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे.शासन आणि प्रशासकिय स्तरावर पत्रकारांच्या हितासाठी काहीही हालचाल होत नसल्याने पत्रकारांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वैजापूर येथील दैनिक लोकपत्र चे पत्रकार मिलिंद वाघमारे हे गेल्या १५ वर्षांपासून दैनिक लोकपत्र चे काम करतात . लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार’ ‘ मिलिंद वाघमारे सचोटीचे,शांत,संयमी आणि सहकार्यशिल असा त्यांचा स्वभाव होता .ऐन तारुण्यात मिलींद वाघमारे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.वाघमारे यांच्या जाण्यामुळे लोकपत्र टीमचा एक खंदा क्षेत्ररक्षक गमावला आहे,एक खंदा सहकारी गेला.’ अशा शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली.विशेष म्हणजे पत्रकार बद्दल कोरडी सहानुभूती न दाखवता लोकपत्र परिवाराने दीवंगत पत्रकार मिलिंद वाघमारे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.आणि वाघमारे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा पदवी पर्यंतचा संपूर्ण खर्च लोकपत्र करणार असल्याचे सांगण्यात आले.