Home बुलडाणा महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या वतीने तेली समाजाच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या वतीने तेली समाजाच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

173

 

 

देऊळगावराजा , प्रतिनिधी

 

ओबीसीची जातिनिहाय जनगणना व तेली समाजात हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर मागासवर्गीयांमध्ये विलीन करणे व विविध समस्या सोडवण्यासाठी तहसिलदारामार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहेत
तेली समाजाच्या विविध मागण्यांसाठी दे.राजा तहसीलदार डॉ सारीका भगत यांना निवेदन देण्यात आली असून त्यात आपल्या प्रमुख मागण्या मांडण्यात आले आहेत त्यामध्ये हिमाचल प्रदेश मध्ये तेली समाजाला मागासवर्गीय जातीमध्ये समाविष्ट केलेले असून त्यांचे क्षेत्र हिमाचल यापुरतेच मर्यादित न ठेवता तोच निर्णय संपूर्ण देशात लागू करावा देशातील सर्व ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार कमीतकमी 52 टक्के आरक्षण देण्यात यावेत राज्य राज्यातील ओबीसी जाती पोटजाती या मधील दुजाभाव बंद करावा व सर्व पोट जातींना मुख्य जातीमध्ये ओबीसी’मध्ये समाविष्ट करून घ्यावेत सध्या स्थितीत अस्तित्वात असलेल्या ओबीसी मध्ये मिळत असलेली टक्केवारी मध्ये 27 टक्के प्रमाणित असून नऊ ते दहा टक्के मिळते आणखी जातीचा सामाविष्ट करू नये क्रिमिलियर ही आर्थिक निकष अन्यायकारक योजना बंद करावेत जनगणनेचा फॉर्म जाती जातीच्या काँलम सुधारित करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा तहसीलदारांना निवेदन देऊन देण्यात आले या निवेदनावर दादा व्यवहारे ,संघटक सुषमा राउत महीला जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर रायमूल , तालुका अध्यक्ष संतोष माळोदे संदीप वारुळे स्वपनील सोनूने दिलीप राउत ,धनंजय रायमूल ,धिरज जाधव ,कृष्णा सोनूने,धनराज राउत ,शैलेश काळे ,ओम सोनूने यांच्या सह्या आहेत . व पं.समीती उपाध्यक्ष हरी भाउ शेटे उपस्थित होते

 

—————————————-
फोटो कॅप्शन
दे.राजा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यासाठी निवेदन देताना समाज बांधव ,