Home जळगाव त्या ८शेतकऱ्यांसाठी आले जळगावकर धावून- दिवसभर बाफना गोशाळा, एमआयडीसी पोलीस स्टेशन व...

त्या ८शेतकऱ्यांसाठी आले जळगावकर धावून- दिवसभर बाफना गोशाळा, एमआयडीसी पोलीस स्टेशन व कोर्ट असे शेतकऱ्यांच्या नशिबी चकरा

129
0

 

जलगाँव:(एजाज़ गुलाब शाह)
पाचवे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्या आठ शेतकऱ्यां ची ८२ जनावरे एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव ने शेतकऱ्यांकडून अंडरटेकिंग लिहून घ्यावे व बाफना गोशाळे कडून ती जनावरे पंचनामा करून शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावी व त्या शेतकऱ्याला पन्नास रुपये प्रतिदिन खावटी जनावरा बद्दल देणे आवश्यक आहे असे आदेश असल्याने काल रात्री शेतकरी व शेतकरी मित्र फारुक शेख यांच्या नेतृत्वात झिया बागवान, अनिस शाह, एडवोकेट बुऱ्हाण पिरजादे, एडवोकेट जुबेर जहांगीर खान, एडवोकेट शरीफ पिंजारी, एडवोकेट अमीर शेख, सैयद चाँद, अन्वर खान सिकलगर,आदींनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जाऊन तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विशाल वठारे यांची भेट घेऊन त्यांना जनावरांच्या खावटी बाबत ३ लाख ८७ हजार रुपये भरण्यास तयार असल्याचे लेखी पत्र फारुक शेख यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

*बुधवारी शेतकऱ्याच्या नशिबी पुनःश्च चकरा*

बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद व सचिन मुंडे यांच्यासह शेतकरी व स्पेशल मुखत्यार हे बाफना गोशाळा केंद्र कुसुंबा येथे सकाळी अकरा वाजता पोहोचले असता अकरा ते दुपारी एक पर्यंत त्या ठिकाणी शेतकरी व पोलिसांच्या कडून कोणीही पैसे स्वीकारायला गोशाळेचे व्यवस्थापक हजर नव्हते, एवढेच नव्हे तर कोणीही कोणत्याही प्रकारे बोलायला तयार नसल्याने शेवटी तिथून दुपारी एक वाजता फारुक शेख यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी कार्यालयात बोलावून घेतले.

*पोलीस अधीक्षक डॉ मुंडे नी जाणून घेतली व्यथा*

शेतकऱ्यांच्या वतीने फारुक शेख यांनी माननीय पोलीस अधीक्षक डॉ प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना न्यायालयाने दिलेले आदेश, न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे व सर्व कागद पत्रे दाखवून चर्चा केली असता माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आपण कायदेशीर रित्या अत्यंत चांगल्या व सकारात्मक परिस्थिती अहात, तुम्हाला शंभर टक्के जनावरे मिळतील याची खात्री बाळगा असे ठोक आश्वासन मिळाल्याने सदरची शेतकरी यांनी डॉ मुंडे यांचे आभार व्यक्त केले.
*पुनःश्च कोर्टात हजर*
पोलीस व शेतकरी दुपारी २.३० वाजता न्यायालयात हजर झाले पोलिसांनी अर्ज दाखल केला की बाफना गो शाळा न्यायालयाचे आदेश पाळत नाही
सकाळपासून जनावरं ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य पोलीस व शेतकऱ्यांना गो शाळा करत नसल्याने कोर्टाने योग्य ते निर्णय घेऊन आदेश पारित करावे अशी विनंती केली असता माननीय न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांनी बाफना गो शाळेला पुन्हा एक संधी देण्यात यावी व जर त्यांनी जनावरे शेतकऱ्यांना देण्यात टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे लेखी आदेश दिले.

*बाफना गो शाळेचे चे व्यवस्थापक सिंग व वकील यांच्याशी चर्चा*
बाफना गोशाळेचे स्पेशल मुखत्यार व अर्जदार सिंग त्याच प्रमाणे गोशाळेचे वकील एडवोकेट न्याती व एडवोकेट रोकडे तसेच शेतकऱ्यांच्या वतीने फारुक शेख, एडवोकेट बुर्‍हाण पिरजादे, एडवोकेट जुबेर जहांगीर खान यांनी सकारात्मक चर्चा केली असता गुरुवारी सकाळी साडे आठ ते दहा वाजेच्या दरम्यान जनावरे देण्याचे आश्वासन गो शाळेतर्फे देण्यात आलेले आहे.

*शेतकरी खावटी साठी १० मिनिटात ४ लाख रु जमा करणारे जळगावकर*
शेतकऱ्यांना ५० रु प्रति दिन प्रत्येक गुरांची खावटी ही ९५ दिवसाची देणे आवश्यक असल्याने शेतकरी पहिलेच अडचणीत असल्याने पुन्हा ती जनावरे खावटी साठी अडून पडता कामा नये म्हणून फारूक शेख यांनी जळगावकर यांना शेतकऱ्यांसाठी मदतीची याचना करताच त्या ५ जलगावकरांनी त्वरित ४ लाख रु उपलब्ध करून दिले तेव्हाच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू नी वाट करून दिली. वेळ आल्यावर त्या जलगावकराना सामोरे आणेल व त्यांचा गौरव करण्यात येईल कारण *माणुसकी अद्याप जिवंत आहे हे जळगाव कारांनी दाखवून दिले…*