Home बुलडाणा चिखलीत महादेवाला दुधाचा अभिषेक करत स्वाभिमानीचे आंदोलन…

चिखलीत महादेवाला दुधाचा अभिषेक करत स्वाभिमानीचे आंदोलन…

262

माजी खा.शेट्टी यांनी केली होती दुध आंदोलनाची घोषणा…

चिखली – प्रा. तनज़ीम हुसैन

बुलढाणा – दुधाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याने दुधाला प्रतिलिटर १०रु अनुदान देण्यात यावे,या सह दुध उत्पादकांच्या मागण्या घेऊन बोरगाव काकडे येथील ओलांडेश्वर संस्थान येथे दि २१जुलै रोजी महादेवाचे विधीवत पुजन करुन दूध अभिषेक करुन नितिन राजपुत,भगवान मोरे,राम अंभोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे.
दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी ऐन लाँकडाऊनच्या काळात अडचणीत सापडला आहे. दुध उत्पादक शेतकर्याची परीस्थीती पाहता शासनाने दुधाला अनुदान देण्यासह इतर मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी १७जुलै रोजी घोषणा करुन २१जुलै रोजी एक दिवसीचे लाक्षणिक दुध बंद आंदोलनाची घोषणा केली होती.दरम्याण आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाने दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देण्यात यावे,दुध पावडर करीता ५० रु. अनुदान देण्यात यावे,दूध पावडर आयात बंद करा,यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्या घेऊन चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील ओलांडेश्वर संस्थान येथे महादेवाचे विधीवत पुजन करुन दुध अभिषेक करुन एक दिवसीय लाक्षणिक दुध आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी कार्यकरत्यांनी प्रचंड घोषणा बाजी करत हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी नितीन राजपूत,भगवानराव मोरे,रामेश्वर अंभोरे,राधाकिसन भुतेकर,भारत खंडागळे, सरदारसिंग इंगळे,संतोष शेळके, सुधाकर तायडे, कार्तिक खेडेकर दीपक धनवे,गजानन पंडित,कार्तिक खंडागळे,यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.