पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांना संधी द्या.. मुख्यमंत्र्यांसह सैनिक कल्याण मंत्र्यांना शंभुसेनेचे निवेदन

Advertisements
Advertisements

शिवसेना प्रमुखांकडे शंभुसेना प्रमुखांची जोरदार मागणी

पुणे – सध्या संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीमुळे संसर्गाचा धोका सर्वसामान्यांना होऊ नये त्यामुळे महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात काही काळ प्रशासक नेमण्याचा स्तुत्य निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी,या निर्णयामुळे असामाजिक किंवा चुकीच्या लोकांची निवड होऊन स्वार्थ हेतू साधला जाऊ शकतो, त्यामुळे याला पर्याय म्हणून नि:स्वार्थ देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा विचार व्हावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच कृषी व सैनिक कल्याण मंत्री व शिवसेना नेते मा. दादाजी भुसे साहेब यांना माजी सैनिक,शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपकजी राजेशिर्के यांनी निवेदन पाठवत नुकतीच जोरदार मागणी केली आहे.

सध्या तरी राज्यात गावपातळीवर माजी सैनिकांबद्दल पोटात एक अनं.. ओठावर एक..अशी परिस्थिती असून स्वार्थी राजकीय पुढारी मंडळी जाणीवपूर्वक माजी तसेच शहीद सैनिकांच्या कुटूंबाला टाळून स्थानिक राजकारण करत असतात म्हणून ठाकरे सरकारने ध्वजारोहनाच्या धर्तीवर देशसेवा केलेल्या व सध्याही समाज कार्यात सतत सक्रीय असणाऱ्या माजी सैनिकांना ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा विचारा करावा अशी मागणी माजी सैनिकांसह सामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे.

मा.मुख्यमंत्री व मा. सैनिक कल्याण मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, माजी सैनिक व शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपकजी राजेशिर्के यांनी म्हंटले आहे की, राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माजी सैनिकांना काही जागा राखीव ठिकाणी शहीद कुटुंबातील लोकांना तसेच माजी सैनिकांना प्रशासक म्हणून काम करण्याची संधी देण्यात यावी, जेणेकरून समाजाला सैनिकी कार्याची शिस्त व देशभक्तीसह निखळ लोकशाही मार्गाने कामकाज करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतील, भारतीय सैनिक वेळोवेळी देशावर परकीय, आसमानी व महामारी सारख्या संकटांना आजी , माजी सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देश व समाजासाठी कार्य केले आहेच.

आताच्या कोरोना महामारीतही हजारो माजी सैनिक नि:स्वार्थ, विना-मोबदला कोविड योद्धा म्हणून सेवा-कार्य करत आहेत. प्रत्येक ठिकाणी माजी सैनिक कोणतीही अपेक्षा न- ठेवता देश व समाजहित लक्षात घेऊन कार्य करत असतात म्हणून ग्रामपंचायत मध्ये प्रशासक निवडताना देखील आपल्या माजी सैनिकांचा विचार करण्यात यावा अशी नम्र विनंती,राज्यातील शंभुसेनेचे माजी सैनिकांनी केली आहे, मुख्यमंत्री साहेब कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांना पाठवलेल्या निवेदनावर माजी सैनिक दिपकराजे शिर्के, सुनिल काळे, बाबासाहेब जाधव, आनंद ठाकूर, बी.व्ही.जाधव, अशोक हांगे आदींसह अन्य माजी सैनिकानांच्या सह्या आहेत.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

खोटे स्वाक्षऱ्या करून निवेदन तक्रार देऊन शिक्षण विभागाची दिशाभूल करणार्यांवर तात्काळ कार्यवाही करा – ए.आई.एम.आई.एम

नूर उर्दू शाळेबाबत गळव्हा येथील नागरिकांचे खोटे निवेदन , तक्रार देणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीची गावकऱ्यांची मांगणी ...
मुंबई

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

 मुंबई – सर्वच्य न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात व नोकरी मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणास स्थगिती ...
पश्चिम महाराष्ट्र

राज्यस्तरीय बचत गट परिषद- 2020 देशाच्या विकासामधे महिलांच योगदान खूप मोलाच आहे –  डॉ श्री प्रशांत खांडे

“बचत गट ….महिला विकास” राज्यस्तरीय बचत गट परिषद संपन्न दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी पुणे ...
जळगाव

सोशियल मीडिया वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो एडिटिंग करून सामाजिक भावना दुखावल्या बद्दल छत्रपती क्रांती सेना ने केली पोलिसात तक्रार

रजनीकांत पाटील अमळनेर शहरप्रतिनिधी – छत्रपती क्रांती सेना मार्फत भिलवाडा येथिल ताराचंद खेतावत याने फेसबुक ...