Home पश्चिम महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या सौजन्याने ज्येष्ठांनी आनंदी जीवन कसे. : प्रतापसिंह भीमसेन साळुंके...

ज्येष्ठ नागरिक संघाच्या सौजन्याने ज्येष्ठांनी आनंदी जीवन कसे. : प्रतापसिंह भीमसेन साळुंके यांचे व्याख्यान

33

पुणे (इंदापुर प्रतिनीधी अतुल सोनकांबळे)

आज दिनांक 27 मे 2023 वार शनिवार सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठांनी आनंदी जीवन कसे जगावे . प्रो.प्रतापसिंह भीमसेन साळुंके यांचे व्याख्यान जेष्ठांसाठी आयोजित केले होते .सर्वप्रथम या महिन्यातील ज्येष्ठ नागरिकांचे ज्यांचे वाढदिवस आहे. संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे यांनीआशा ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे, विशेषतवन चे गायन प्रमोद भंडारी, यांनी केले.नंतर ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे मा. अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्याते श्री.प्रतापसिंह सांळुखे यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे सर यांनी केला.प्रा. प्रताप सिंह साळुंखे यांचा परिचय सुभाष महाजन यांनी करून दिला. व्याख्यानाला सुरुवात झाली.ते म्हणाले आपल्या जीवनाती लोभ नाहीसा झाला पाहिजे , प्रत्येक माणसाने आपले जीवन दुसऱ्यासाठी ही जगले पाहिजे. महात्मा फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी ,बाबा आमटे, ही महान माणसे दुसऱ्यासाठी जगली दुसऱ्याच्या कल्याणामध्ये आपले कल्याण मानले, आयुष्यभर समाजासाठी जगणारी माणसे ही होती. अनेक विचारवंतांनी, शास्त्रज्ञांचीनी, यश अपयश याचा विचार न करता आपले जीवन ते जगत राहिले. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी जेष्ठ नागरिक यांना मोलाचा संदेश दिला की आपण सुद्धा साठी नंतर पुन्हा जीवनात यशस्वी होऊ शकतो ध्येय शक्ती अंगी बाळगी पाहिजे सर्व काही मिळते, असे सशक्त विचार प्राध्यापक साळुंखे सरांनी मांडले.
कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे सर यांनी केली. आभार श्री हनुमंत शिंदे सरांनी मानले. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिक संघाचे भानुदास पवार, रघुनाथ दादा खरवडे, पांडुरंग जगताप, खबाले महाराज, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, भारत बोराटे सर, महादेव चव्हाण सर, केशव बनसोडे सर, जाधव मॅडम, देशपांडे, सिकंदर इनामदार, ज्येष्ठ पाणबुडे गुरुजी,