Home पश्चिम महाराष्ट्र पुणे.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकचा क्र.2 . पुणे या कार्यालयाच्या पथकाचा...

पुणे.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकचा क्र.2 . पुणे या कार्यालयाच्या पथकाचा गावठी हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी छापा……

42

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधीः धनाजी शेंडगे.

दि 26. 5. 2023 व दि. 27.5.2023 रोजी मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य डॉ.विजय सुर्यवंशी. सो. व. मा. विभागीय उपायुक्त पुणे विभाग श्री मोहन वरदे सो. अधीक्षक श्री चरणसिंग राजपूत. सौ. उपअधीक्षक श्री. एस .आर. पाटील सो.श्री. युवराज शिंदे सो. व एस. व्ही.श्री जगदाळे सौ.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तानाजी बी शिंदे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पुणे यांच्या पथकाने अवैधपणे गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व वाहतूक करणाऱ्या लोणी काळभोर उरुळी कांचन ता. हवेली तसेच सहजपूर तालुका दौंड जि. पुणे. या ठिकाणी अचानकपणे छापा टाकून गावठी हातभट्टी निर्मित करणाऱ्या भट्टी मालक कामगार जागा मालक तसेच गावठी दारूची वाहतूक करणारा असे 7 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्य गुन्हा नोंद.करण्यात आला आहे. गुण्याच्या ठिकाणाहून8400. लि. रसायन व 805 लि. गावठी हातभट्टी दारू निर्मिती साहित्य व एक तीन चाकी रिक्षा वाहन असा एकूण रु.3.62,200 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक श्री आर डी भोसले व श्री. बीबी नेवसे तसेच जवान सर्व.श्री. किशन पावडे. गणेश वव्हाळे. कल्लेश्वर मुस्तापुरे व वाहन चालक अभिजीत शिसोलेकर यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री तानाजी बी शिंदे हे करीत आहेत तसेच अशाप्रकारे अवैध्य. मध्यबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग संपर्क साधावा.