Home मराठवाडा हिरा गोल्ड कंपनी ने फसवणूक केलेल्या गुतवनुकदारांना तक्रारी करण्याचे पोलिसांचे आवाहन

हिरा गोल्ड कंपनी ने फसवणूक केलेल्या गुतवनुकदारांना तक्रारी करण्याचे पोलिसांचे आवाहन

108

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १० :- इस्लामी शरियत प्रमाणे कंपनी बिजनेस करीत आहे व गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकी पोटी प्रत्येक महिन्याला एक लाखावर 3000-3200 रुपये नफा म्हणून दिला जाईल असे आश्वासन देऊन हजारो मुस्लिम लोकांची फसवणूक करून हजारो कोटी रुपयाचा गंडा घातल्याबद्दल हैदराबाद हिरा गोल्ड कंपनी ची सर्वेसर्वा नोव्हेरा शेख मागील दीड वर्षापासून तुरुंगाची हवा खात आहे.
नोवेरा शेख च्या हिरा गोल्ड कंपनी विरुद्ध देशात एकूण 20 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील 9 गुन्हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. यातील एक गुन्हा औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी श्रीमती दुर्वेशहवार बेगम मुबश्शीर हुसेन राहणार पानदरीबा, बोहरी कठडा, औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून दिनांक 21 /10 /2018 रोजी पोलीस स्टेशन सिटी चौक येथे नोंदविण्यात आला होता. डिसेंबर 2018 मध्ये या गुन्ह्यात नोवेरा शेख ला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तिचा पोलिस कस्टडी रिमांड ही घेण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सध्याही आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व्यतिरिक्त आणखीही काही गुंतवणूकदारांनी पोलिसांसमोर हजर येऊन आपले जवाब नोंदविले आहे. परंतु अजून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी अद्यापही समोर येऊन कंपनीविरुद्ध पोलिसांकडे जबाब नोंदविलेले नाहीत.

हिरा गोल्ड ग्रुप ऑफ कंपनीज ची मालकिन नोव्हेरा शेख व तिच्या साथीदारांनी औरंगाबाद येथील ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली असेल अशा गुंतवणूकदारांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित कागदपत्रे घेऊन आपले जबाब नोंदवावे. असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी एस सिनगारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.