Home पश्चिम महाराष्ट्र पुण्यात कोरोनाचे एकुण ५ रूग्ण- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुण्यात कोरोनाचे एकुण ५ रूग्ण- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

101
0

राजेश भांगे

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी व सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ५ रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण जरी आढळून आले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.