Home उत्तर महाराष्ट्र राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा द्यावा

राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा द्यावा

66
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

जळगाव , दि. ०९ :- राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर तांत्रिक थांबा देण्याची मागणी माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे नुकत्याच घेण्यात आलेल्या भेटीत केली. आठवड्यातून चार दिवस २२२२१/२२२२२ राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावते. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने आठवडेभर ही गाडी सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. भुसावळला द्यावा तांत्रिक थांबा राजधानीला जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला असलातरी पाणी भरणे, चालक दल बदलणे या सुविधा उपलब्ध नाही शिवाय या सुविधा येथे उपलब्ध करावयाच्या म्हटल्यास वेळेसह निधीची तरतूद करावी लागणार आहे. जळगाव हे जंक्शन असल्याने पश्चिम रेल्वेकडून नागपूर कडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते. चालक दलास भुसावळ येथून पाठवावे लागते त्या कारणाने भोपाळ येथे एक्स्प्रेस पोहोचेपर्यंत त्यांच्या कामाच्या तासात वाढ होते याचा परीणाम त्यांच्या कार्यशैलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुसावळ येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भुसावळ येथे तांत्रिक थांबा दिल्यास वेळ आणि पैश्याची बचत होऊन गाडीला उशीर होण्याची शक्यता नाही, याबाबत रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.