Home सोलापुर अक्कलकोट नगरपालिकेला ओडीएफ प्लस प्लसचे मानांकन

अक्कलकोट नगरपालिकेला ओडीएफ प्लस प्लसचे मानांकन

236
0

सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळ

अक्कलकोट – सतीश मनगुळे

केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये अक्कलकोट नगरपालिकेला ओडिएफ प्लस प्लसचे मानांकन मिळाले आहे.
यामुळे शहराला आता
नगर विकास विभागाकडून लाखो रुपयांचा निधी
विकास कामांसाठी मिळणार
आहे.याबाबतचे प्रमाणपत्र पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली.मागे २०१८ मध्ये एकदा अक्कलकोट शहर डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या कार्यकाळात पहिल्या टप्प्यात हागणदारीमुक्त झाले होते. त्यानंतर अक्कलकोट शहराला ओडीएफ प्लस दर्जा मिळाला होता.त्यानंतर मात्र काही काळ याला ब्रेक लागला होता. परंतु मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या प्रयत्नातून ओडीएफ प्लस प्लसचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय पथकाने यासंदर्भात जानेवारी महिन्यात कामांची पाहणी केली होती व समाधान व्यक्त केले होते.त्यानंतर त्याचा अहवाल केंद्राला सादर करण्यात आला.यासाठी नगरपालिकेने सोलापूर रोडवरच्या कचरा डेपो
जवळ एफएसटी प्रकल्प उभा केला आहे. त्यामाध्यमातून शहरातील सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयावर फोकस केले गेले.नगरपालिकेने केवळ शौचालय बांधले नाहीत तर ते वापरात कसे येतील
याकडे जास्त लक्ष दिले गेले.आणि त्याचा निर्माण होणारा मैला जो आहे त्याची देखील चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली हे या मोहिमेचे यश म्हणावे लागेल.
जानेवारी महिन्यात जी
टीम येऊन गेली त्यावेळी
सर्व कामांची पथकाने प्रत्यक्षात पाहणी केली होती. त्यानंतर सरकारने
हे नाव जाहीर केले
आहे.स्वच्छ भारत ही
केंद्र सरकारची अतिशय महत्वकांक्षी योजना आहे.त्यामुळे सर्वांचे लक्ष
या योजनेकडे लागले होते.यावर मधल्या काळात राज्य सरकारचाही मोठा फोकस होता.या यशामुळे अक्कलकोट नगरपालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षणमधील कामगिरीवर मोठा परिणाम
होणार आहे.तेथील रँकिंगमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
तसेच शहराला प्लस प्लसचा दर्जा मिळाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अक्कलकोट शहर हे मोठे
तीर्थक्षेत्र आहे.नगरपालिका
‘ब’ दर्जाची आहे.त्यात स्वच्छ भारतमध्ये उत्कृष्ट कामगिरी झाल्यामुळे निधी मिळण्यास आता कोणतीही अडचण येणार नाही.

सर्वांच्या सहकार्याचे फळ

शहर हागणदारीमुक्त करण्यामध्ये पदाधिकारी
आणि कर्मचारी यांचा देखील मोठा वाटा आहे.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे सहकार्य या कामात मिळाले.त्याचेच
हे फळ आहे.यापुढेही सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
यातूनच शहराचा विकास होईल.विशेष म्हणजे निधीची कमतरता भासणार नाही – आशा राऊत ( मुख्याधिकारी )