Home मराठवाडा आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची शासनाची भुमिका – पालकमंत्री अशोक चव्हाण

आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची शासनाची भुमिका – पालकमंत्री अशोक चव्हाण

112
0

नांदेड , दि. ९ : ( राजेश भांगे ) – आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची शासनाची भुमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शिवाजीनगर महानगरपालिका दवाखाना येथे महिला आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी महापौर सौ. दिक्षा धबाले, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपमहापौर सतिश देशमुख, स्थायी समिती सभापती अमितसिंह तेहरा, दिपकसिंह रावत, विरेंद्रसिंह गाडीवाले, खालसा प्रकाशकौर सुरजितसिंघ, उपसभापती डॉ. आशिया कौसर मो. हबीब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने महिलांसाठी रोग निदान शिबिराचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आरोग्य सेवा अतिशय महत्वाची आहे. नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभुत सुविधेचा चांगला वापर झाला पाहिजे. या सुविधा देण्यासाठी कायम आपण प्रयत्नशील राहिलो आहे. या दवाखाण्याचा परिसर हा गजबजलेला असून येथे आरोग्याची उत्तम सेवा देण्यासाठी कायमस्वरुपी मनुष्यबळ उपलब्ध राहिले पाहिजे.
देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. कर्करोगाचे निदान खर्चीक असले तरी सुरवातीला या रोगाचे निदान झाले तर यात यश मिळते.
गरिबांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचा हा प्रयत्न असून या शिबिरात गरजू व्यक्तींना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावून त्यांना चांगले आरोग्य मिळाले पाहिजे, यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला, कर्मचारी, नागरिक, रुग्ण आदींची उपस्थिती होती.

Previous articleराजधानी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा द्यावा
Next articleसावकार ग्रस्त शेतकरी यांच्या तक्रारी बाबत बैठक
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here