Home वाशिम मुख्याध्यापकानेच केला राष्ट्रध्वज आणी राष्ट्रगिताचा अपमान? गावातील कारभारी बघ्याच्या भूमिकेत

मुख्याध्यापकानेच केला राष्ट्रध्वज आणी राष्ट्रगिताचा अपमान? गावातील कारभारी बघ्याच्या भूमिकेत

112

कार्य वाहीची मागणी;कारंजा तालुक्यातील घटना

वाशिम:-कारंजा तालुका पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या ग्राम मसला येथील जी. प. शाळेवरचे मुख्याध्यापक यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करताना सर्व नियमावलीची खिल्लत उडवीत साऱ्या गावकऱ्या समोर राष्ट्र ध्वजाचा अपमान केला, राष्टगितही म्हणता आले नसल्याने मोबाईल वरून राष्ट्र गीत घेण्याचा किळसवाणा प्रकार सदर शाळेवर घडल्याने तालुक्यात मुख्यध्यापक हे आज तालुक्यात चर्चेचा विषेश बनले होते त्यामुळे त्याचेवर कार्य वाही करण्याची मागणी अनेक समाज माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे हे याआधीही बर्‍याच प्रकरणामध्ये हे शिक्षक वादग्रस्त ठरले असुन यांचे *धोंडी* प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजलेले होते.याप्रकरणी सबंधित प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
कारंजा तालुक्यातील जी. प.शाळा मुख्याध्यापक यांनी राष्ट्रध्वज चा अवमान केला असून राष्ट्र ध्वजाची गाठ सुटता सुटेना त्यामुळे सदर मुख्याध्यापकाने राष्ट्र ध्वज तीनदा खाली उतरून आणि अर्ध्यावर फडकवत नेला आहे सदर मुख्याध्यापक हे वादग्रस्त असल्याचे गावातील लोकांनी सांगितले त्यात त्यांनी राष्ट्र ध्वजाला मानवंदना ,सलामी देण्यासाठी मुलांना रोखल्याचे सांगण्यात आले आहे राष्ट्र गीत हे विध्यार्थी आणि शिक्षकांच्या मुखपाठ असायला पाहिजे मात्र त्याच्या व्यायरल झालेल्या व्हिडीओ तून तसे दिसत नाही तर राष्ट्र गीत येत नसल्याने मोबाइल वरून राष्ट्रगीत घेतल्या गेले त्यामुळे राष्ट्रध्वज अवमान सोबतच राष्ट्र गिताचाही अवमान केला गेल्याने त्याचे वर कारवाही करण्याची मागणी गावातून जोर धरीत आहे.ध्वज फडकविताना तीनदा खाली उतरून खाली असतानाच झेंडा फडकविल्याने सदर मुख्याध्यापक त्यांचा घरचा कार्यक्रम आहे की काय? व्हिडीओत अशाप्रकारे असे वावरत असल्याचे दिसते आहे तर ध्वज फड़कला नाही तोच दूसरा व्यक्ति हसत आहे.त्यामुळे देशासाठी लोकानी रक्ताचा पाणी केल आणि मोठ्या मेहनतीने आपल्या देशात आपली मानके ठरऊन त्याच्या सन्मानासाठी नियमावली ठरविण्यात आली त्याचे उलघन जर शिक्षक करीत असतील तर ? शाळेचा दर्जा सुधारेल कसा? ज्याच्यावर संस्कार आणि शिक्षण देण्याची जबाबदारी आहे तेच बेजबाबदार पने राजरोस राष्ट्रीय मांनकांचा अवमान करीत असतील तर ? विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावयाचा तरी कसा असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला असून वर्षातून एक दोनदा येणारे ध्वजारोहन नीट साजरा करु शकत नसल्याने या घटनेचा गावकऱ्यांनी खेद व्यक्त करीत कार्यवाही ची मागणी केली आहे.

*कार्यवाही काय होणार याकडे तालुका वाशियंचे लक्ष?*
राष्ट्र ध्वज अवमान प्रकरणी दोषीवर काय कार्यवाही होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले असून सखोल चौकशी करून कठोर कार्य वाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठा शी संपर्क साधला असता पारदर्शी चौकशी करुण दोषी वर योग्य कार्रवाई चे संकेत प्रतिनिधि शी बोलताना वरिष्ठ अधिकारी यांनी दिले आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206