Home यवतमाळ मावस भावाच्या मदतीने जावयाने काढला सासऱ्याचा काटा ( महागाव तालुक्यातील काऊरवाडी शिवारातील...

मावस भावाच्या मदतीने जावयाने काढला सासऱ्याचा काटा ( महागाव तालुक्यातील काऊरवाडी शिवारातील घटना,जागलीला गेले असता केला होता हल्ला )

176

महागाव / हरीश कामारकर

जुन्या घरगुती वादातुन मावसभावाच्या मदतीने शेतात जागलीला गेलेल्या सासऱ्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते त्यात उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाल्याने महागाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत आरोपींना अटक केली आहे.
महागाव तालुक्यातील काउरवाडी शिवारातील राजेंद्र ठाकरे यांच्या शेतात जागलीला गेलेल्या अरूण नारायण खोकले(वय५५वर्ष,रा.राऊतवाडी) यांच्यावर दिनांक१८जानेवारी(बुधवार) रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करीत तुरीच्या शेतात फेकुन दिले होते सकाळ होवुनही आपले वडील घरी न आल्याने त्यांच्या मुलाने शेतात जावुन पाहणी केली असता त्यांना आपले वडील गंभीर जखमी व बेशुद्धावस्थेत आढळुन आले याची माहिती शेतमालक व पोलिसांना दिली व आपल्या वडिलांना उपचारासाठी पुसद येथे व तेथुन यवतमाळ येथे हलविले परंतु अतिरक्तस्त्रात झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जखमीला नागपुर येथे उपचारासाठी हलविले होते परंतु दिनांक २५ जानेवारी(बुधवार ) रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.खोकले यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादि वरून महागाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शेतमालक राजेंद्र ठाकरे यांच्याकडे शेतातील कोणताही माल चोरीला गेला का ?याची विचारपुस केली असता त्यामध्ये कशाचीही चोरी झाली नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत फिर्यादी मारोती खोकले याची विचारपुस केली असता त्यामध्ये त्याने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून जावाई प्रवीण येळणे यांच्यासोबत वाद होऊन मारामारी झाली असल्याचे सांगितले असता त्यादिशेने तपास फिरवुन पोलिसांनी प्रवीण येळणे याला चौकशी साठी ताब्यात घेवुन त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सांगितले की महिनाभरापूर्वी सासरा व मेव्हणा यांच्या सोबत झालेल्या वादाचा सल मनात असतांनाच दिनांक१८जानेवारी रोजी रात्री गावालगत असलेल्या नाल्यावरील पुलावर मावसभावासह बसलो असतांना तिथुन शेतात जागलीसाठी जाणाऱ्या सासऱ्याने माजले का?खाणे जास्त झाले का असे म्हणुन निघुन गेले त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा राग व अगोदरचा वाद व आपली पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरीच ठेवुन तिला सासरी पाठवीत नसल्याचा राग याचा वचपा काढायचा या हेतुने ठाकरे यांच्या शेतातील जागलीवर जावुन तिथे झोपलेल्या सासरा अरुण खोकलेवर मावसभाऊ गणेश कोथळे याच्या मदतीने लाकडी दांडक्याने हल्ला केला त्यानंतर त्यांना तिथुन खाटेसह उचलुन गोठ्याच्या जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ पुन्हा हल्ला करून रक्तबंबाळ अवस्थेत जखमी खोकले यांना शेतात फरफटत नेवुन फेकुन दिले व घरी निघुन गेलो अशी माहिती दिली.जखमी खोकले यांचा मृत्यु झाल्याने महागाव पोलिसांनी आरोपी प्रविण हिरामण येळणे(वय२६वर्षे) व गणेश संजय कोथळे(वय१९वर्षे) दोघेही रा.राऊतवाडी यांना अटक करून त्यांच्याविरोधात भादंवि १८६० कलम ३०२,३४नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिकक्ष पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय खंडारे, उपपोलिस निरीक्षक राहुल वानखेडे,एएसआय नारायण पवार,हेकॉ विलास राठोड,नापोकॉ वसीम शेख,संतोष जाधव,पो कॉ.सुनील जाधव, गजानन मस्के यांनी लावुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.