Home यवतमाळ सावरगांव येथिल मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

सावरगांव येथिल मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

71

कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी लावला २४ तासात छडा.
—————————————-
घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावरगांव (मंगी)येथिल ग्राम दैवत असलेल्या महाकाली मातेच्या मंदिराचे दिनांक २४जानेवारीच्या मध्यरात्री दरम्यान चोरट्याने मंदिराचे कडी व कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश करून देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिन्याची चोरी केली.ही बाब पुजारी कालिदास अरगुलवार यांच्या लक्षात येताच त्यांनी पारवा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी घटना स्थळाला भेट देऊन तपासचक्र फिरविले यात अवघ्या २४ तासात बाहेरगावावरून आलेल्या मानोली येथिल घरफोडी करण्यात सराईत असलेला आरोपी हनुमान रामदास ढोले वय ४० वर्ष याला त्याब्यात घेऊन अटक करण्यात आली.
घाटंजी पोलिसात विविध गुन्हे दाखल असलेला घरफोडी करण्यात सराईत असलेला आरोपी हनुमान रामदास ढोले हा २३ जानेवारी रोजी सावरगावात आला होता.आणि त्याच मध्यरात्री त्याने देवीच्या मंदिराचे कडी व कुलूप तोडून आत प्रवेश करित देवीच्या अंगावरील २१०० रुपयाचे चांदीचे दागिने चोरी केली ही बाब पुजारी व गावाकऱ्यांच्या लक्षात येताच पारवा पोलिसात तक्रार दाखल केली.यावरून भादवी कलम ४६१,३८० अन्वये गुन्हा दाखल करून तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनस्थळी भेट देऊन तपासचक्र फिरविले यात गावात बाहेरचा कोण आला यावर प्रथमदर्शनी तपासात घेतले असता मानोली येथिल घरफोडी करण्यात सराईत असलेला हनुमान रामदास ढोले हा आल्याचे समजले त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेऊन तपास केला असता त्याचे कडे चोरीतील दागिने मिळून आले.यावरून त्याच्येवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आली. त्यांच्येवर घाटंजी पोलीस स्टेशनला सुद्धा विविध गुन्हे दाखल असून आणखी काही चोऱ्या उघडकीस येईल काय याचा सुद्धा तपास केल्या जात आहे.अवघ्या २४ तासात मंदिरातील चोरीचा छडा लावल्याने परिसरातून पारवा पोलिसांवर स्तुती सुमने उधळल्या जात आहे. ही कारवाई पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक बालाजी ससाणे,बिट अंमलदार नपोशी.अविनाश मुंढे,पोशी.अनिल गिनगुले,पोशी.अमोल वाढई,चालक सचिन,राहुल राठोड,मपोशी. रंजना वाटगुरे यांनी केली असून या तपासात गावातील अजय शेंडे,राम शेंडे,विशाल शेंडे,सुरेश शेंडे,पोलीस पाटील यांचे पती सतीश कामटकर या नागरिकांनी पोलिसांना मोलाचे सहकार्य केले.