Home वाशिम पवित्र रमजान महिन्यातील संयम शांतता व एकमेकांना मदत करण्याची शिकवण कायम ठेवावी

पवित्र रमजान महिन्यातील संयम शांतता व एकमेकांना मदत करण्याची शिकवण कायम ठेवावी

31

 

जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी केली किला मस्जिद येथे अफतारी, रोजेदरांशी साधला संवाद

फुलचंद भगत
मंगरुळपीर:-रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात, नमाज आणि पवित्र कुराणाचे पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते. संयमाचा महिना अशीही रमजानची ओळख आहे. यामध्ये मुस्लिम एकमेकांकडे इफ्तारचे आयोजन करत आहेत. त्याच बरोबर गरजूंना मदत केली जाते. हे खरोखरच खूप कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी केले.
शहरातील जुन्या नगरपरिषद व पत्रकार भवनाच्या बाजूस किला मस्जिद येथे नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अफतारीच्या कार्यक्रमासाठी श्री. तरे उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी यासिरुद्दीन काझी, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर जुनेद शेख, समाजसेवक इरफान कुरेशी, समाजसेवक खालेद उर्फ बबलू बागवान, कैसर सर ,नासिर सर, नदीम भाई, अल्ताफ भाई, इंजिनियर सलमान बागबान, इंजिनियर मुझम्मिल मणियार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करण्यात आले. रमजान महिना संयमाचा असल्याने या महिन्यात एकमेकांशी चांगले वागणे गोरगरिबांना मदत करणे एकमेकांची काळजी घेणे आणि इतर धर्मीयांनाही आपली संस्कृतीचा परिचय देणे हे रमजानमध्ये अधिक सुलभतेने दर्शवता येते. पुढच्या आठवड्यात रमजानची ईदही साजरी केली जाणार यानिमित्ताने जिल्हा पोलीस आणि प्रशासन सज्ज असून कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाणार तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या परिसरात शांतता आणि सदभावना कायम ठेवावी. श्री.तारे यांनी यावेळी पवित्र रमजान महिन्याच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी यावेळी मशिदीत येऊन येथे नमाज अदा करण्याचे ठिकाण वजू करण्याचे ठिकाणाची पाहणी केली. संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटाला सर्व रोजेदार बांधवांसोबत त्यांनीही इफ्तार चे फराळ केले आणि लोकांशी संवाद साधला व रमजानबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले दिवसभर अन्न आणि पाण्याच्या त्याग करून सर्वशक्तिमान अल्लाहच्या आदेशाचे पालन केले जाते सर्व समाज बांधव एकत्र येऊन नमाज आणि कुराण पठण करतात ही अत्यंत छान परंपरा आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयातील डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर जुनेद शेख यांनी दुआ केली आणि जगात सर्व ठिकाणी शांतता राहावी ही प्रार्थना केली. दुआ नंतर सर्वांनी इफ्तारी केली.यावेळी परिसरातील रोजदार नमाजी हे मोठया संख्येने उपस्थित होते.